‘मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलं’, असं का म्हणाले नितीन गडकरी?, वाचा सविस्तर.,.

| Updated on: May 07, 2022 | 5:24 PM

नागपुरात मैदानांची  संख्या १८० पर्यंत पोहचल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या मैदानांची संख्या २५० च्या घरात नेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात एक लाख मुलामुलींनी सकाळ संध्याकाळ मैदानात खेळायला हवे, असे आपले स्वप्न असल्याचेही गडकरींनी सांगितले. यावेळी आपल्याला कशाची चीड येते हेही गडकरींनी सांगितले..

मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलं, असं का म्हणाले नितीन गडकरी?, वाचा सविस्तर.,.
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

नागपूर – नागपुरात होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात या वर्षी ३२ खेळ खेळवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी यात ५५ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यासाठी ८० मैदाने तयार करण्यात आली होती, आता नागपुरात मैदानांची  संख्या १८० पर्यंत पोहचल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. या मैदानांची संख्या २५० च्या घरात नेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपुरात (Nagpur)एक लाख मुलामुलींनी सकाळ संध्याकाळ मैदानात खेळायला (sports activities)हवे, असे आपले स्वप्न असल्याचेही गडकरींनी सांगितले. यावेळी आपल्याला कशाची चीड येते हेही गडकरींनी सांगितले..

लहानग्यांच्या हातात मोबाईल नको

आपल्याला सर्वाधिक चीड आणणारी गोष्ट काय असेल तर चारपाच वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाईल असतो. असं गडकरी म्हणाले. मी माझ्या सुनेला सांगितलं की तुझा मोबाईल घरातून खाली फेकून दे, घरात मोबाईल नकोच. मोबाईलने आपलं जगणं खराब करुन टाकलंय. काही तंतत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. असेही ते म्हणाले.

व्यक्तित्व निर्माणासाठी मैदाने, खेळणे महत्त्वाचे

शहरात चांगले स्विमिंग पूल व्हावेत, बँडमिंटन, लॉन टेनिस यांच्यासाठी कोर्ट असवीत. योगासनासाठी, व्यायामासाठी वेगवेगळी व्यवस्था असावी, असे मत गडकरींनी व्यक्त केले. कबड्डी, खोखो, धावणे, एथलिट्ससाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी व्यवस्था व्हायला हवी. अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. हे केवळ मनोरंजन नाही तर खेळांमुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते नागपुरात नागभूषण पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नागपुरात आणि विदर्भात चांगले खेळाडू, चांगले कलाकार असल्याचे सांगितले. श्री. श्री. रवीशंकर यांच्या उपस्थितीत विदर्भातील १३०० कलाकारांचा कार्यक्रम केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

नागपुरातील मान्यवरांच्या कतृत्वाचं आणि इतिहासाचं जतन व्हावं.

नवे लष्करप्रमुख मनोज पांडे हे नागपूरचे असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. त्यांच्याप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, वकील हरीश साळवी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांसारख्या खूप मोठ्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिंनी नागपूरला मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. या सगळ्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी इतिहासाचे जतन व्हायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली. नागपूर शहराला ३०० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने याबाबत विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नागपूर शहर औद्योगिक विकासासोबतच, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहायला हवं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.