नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, अपघातात सात जण ठार

तवेरा गाडी ओव्हरटेक करत असल्यामुळे अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक चिमुकली बचावली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, अपघातात सात जण ठार
तवेराचा भीषण अपघातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 9:52 AM

नागपूर – नागपूर (Nagpur) उमरेड रोडवर भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातामध्ये सात जण जागीचं मृत्यू झाला आहे. भरधाव तवेरा (Tavera)  गाडी ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. सात मृतांमध्ये सहा महिला एका पुरुषाचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. उमरेडवरुन नागपूरला येताना उमरगाव (Umargaon) फाट्याजवळ रात्री 10 वाजता अपघात झाला आहे. तवेरा गाडी ओव्हरटेक करत असल्यामुळे अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक चिमुकली बचावली आहे. तिच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं

भरधाव तवेरा नागपूर उमरेड रोडवरून निघाली होती. त्यावेळी ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाला आहे. ही घटना रात्री दहा वाजता उमरगाव फाट्याजवळ घडली आहे. तवेरा ओव्हरटेक करीत असताना ट्रकला समोरून धडकली त्यामुळे सातजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये सहा महिला एका पुरुषाचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. अपघातमध्ये बजावलेल्या चिमुकलीला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिमुकली गंभीर जखमी

रात्रीच्या वेळेस अनेकदा लाईटचा अंदाज न आल्याने अपघात होत असतात.  तसेच गाडीचा अंदाज न आल्याने देखील अपघात होत असतात. काल झालेला अपघात इतका भीषण होता की, घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते हादरून गेले आहेत. त्याचबरोबर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तवेरा चालकाची चुकी असल्याचे अपघात पाहिलेलं लोक बोलत आहेत. तवेरामधील सगळे प्रवाशी जागीच ठार झाले आहेत. तर त्यातील एक चिमुकली गंभीर जखमी आहे. तिला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला

तवेरा गाडीचा क्रमांक 4315 आहे. गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांनी अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी उमरेडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे. सध्या या अपघाताची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. पोलिस उपायुक्त नुरल हसन, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्या अनेक पोलिस घटनास्थळी आले होते. अपघात झाल्यानंतर वाहनांची रस्त्यात मोठी रांग लागली होती. पोलिसांनी महत्त्वाची माहिती आणि पाहाणी केल्यानंतर अपघात झालेली वाहने बाजूला केली.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.