Gadchiroli attack | गडचिरोलीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी, अस्वलाच्या कडपाचा चार महिलांवर हल्ला

महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सकाळी घडली. सीमा रतिराम टेकाम, लता जीवन मडावी, पल्लवी रमेश टेकाम व रमशीला आनंदराव टेकाम या चार जखमी महिलांची नावं आहेत.

Gadchiroli attack | गडचिरोलीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी, अस्वलाच्या कडपाचा चार महिलांवर हल्ला
अस्वलाच्या कडपाचा चार महिलांवर हल्ला Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:33 PM

गडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी (Wildlife) उच्छाद मांडलाय. चार दिवसांपूर्वी वाघाच्या (tiger attack) हल्ल्यात जंगलात फिरायला गेलेला युवकावर वाघानं हल्ला केला होता. काल पुन्हा वाघाने एका महिलेवर हल्ला केला. ही महिला जंगलात शौचास गेली होती. ही घटना चामोर्शी तालुक्यातील आहे. गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने पळ काढला. अशा नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. तरीही जेरबंद करण्याचे कोणतेही प्रयत्न देखील वनविभाग करीत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडं कुरखेड तालुक्यात अस्वलाच्या कळपाने महिला मजुरांवर हल्ला केला. यात चार महिला (attack on female laborers) गंभीर जखमी झाल्यात त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिला कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील तेंदूपत्ता संकलनाकरिता गेल्या होत्या.

चामोर्शीत वाघाचा हल्ला

महिला गावाशेजारी जंगलात शौचास गेली होती. अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. वाघाच्या तावडीतून तिने कशीबशी सुटका केली. पण, वाघ तिथून निघायला तयार नव्हता. गावकरी धावून आले. गावकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर वाघ हळूहळू निघून गेला. त्यामुळं महिलेचा जीव वाचला. या घटनेनं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरखेड्यात अस्वलांचा हल्ला

कोहका राऊंड कक्ष क्रमांक 447 अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जंगलात महिला गेल्या होत्या. या महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सकाळी घडली. सीमा रतिराम टेकाम, लता जीवन मडावी, पल्लवी रमेश टेकाम व रमशीला आनंदराव टेकाम या चार जखमी महिलांची नावं आहेत. कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन केलं जाते. या तेंदु संकलनासाठी आदिवासी व स्थानिक सकाळी जंगलात जातात. संकलन करून दुपारी आपल्या घरी परततात.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.