लकी कुमार घरी रात्री झोपेत असताना सात ते आठ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी गावात प्रवेश केला. लकी कुमारला झोपेतून उठवून जंगलात नेले. गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली.
सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत सामान्य क्षमता चाचणीचा पेपर होईल. दुपारी अडीच ते चार वाजतापर्यंत गोंडी भाषेवरील पेपर होणार आहे. पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचता यावे, यासाठी बाहेरगावचे उमेदवार आधीच गडचिरोलीत पोहचले आहेत. त्यांनी मित्र, नातेवाईक तसेच सार्वजनिक ठिकाणांचा आश्रय घेतला आहे.
विदर्भात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते शिवाय खरेदी केंद्राशिवाय धान पिकाला योग्य दरही मिळत नाही. त्यामुळे यंदा उशीरा का होईना खरेदी केंद्र सुरु झाली आहेत पण काही जिल्ह्यात प्रति एकर 9.6 क्विंटल एवढे धान घेतले जात आहे तर काही ठिकाणी एकरी 14 क्विंटल एवढे धान हे आदिवासी विकास महामंडळाकडून घेतले जात आहे.
धान पीक हेच विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. याच पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते शिवाय खरेदी केंद्र सुरु झाल्यालवरच शेतकऱ्यांना पिकाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळतो. पण गेल्या दीड महिन्यापासून धान खरेदी केंद्र ही बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे किमान पावसाळ्यापूर्वी तरी खरेदी क�
काळाच्या ओघात धान उत्पादनात वाढ होत आहे. एकरी विक्रमी उत्पादन काढले तरी खरेदी केंद्रावर नियमाप्रमाणे 9 क्विंटलची खरेदी हे ठरलेलेच होते. त्यामुळे शिल्लक धानाचे करायचे काय असा सवाल उपस्थित केला जात होता. ही समस्या घेऊन शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून सरकारचा निषेध केला होता. मात्र, मध्यंतरी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्
विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. गडचिरोलीलगत असलेल्या चंद्रपुरात काल 46.8 अंश डिग्री तापमान होता. भर उन्हात काम केल्यामुळं उष्णाघातात या तरुणीचा जीव गेला. चार आणि पाच जूनपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
पावसाळा तोंडावर आला असून आता वातावरणात बदल होऊ लागला आहे. मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यातील 12 ही तालुक्यातील धान कापणी ही पूर्ण झाली होती. शिवाय शेतकऱ्यांनी शेतीमाल हा शेतामध्येच साठवणूक करुन ठेवला होता. शिवाय लागलीच खरेदी केंद्र सुरु झाले तर विक्री सोईस्कर होईल असे शेतकऱ्यांचे गणित होते. पण जिल्हाभरात आदिवासी
गडचिरोली जिल्ह्यात धान पीकच मुख्य आहे.बाराही तालुक्यांमध्ये धान शेतीचे प्रमाण अधिक आहे. याच धान शेतीमधून शेतकरी चार महिन्यात दुप्पट उत्पन्न मिळवतात. अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी 1001 नावाच्या बिजाची रोपणी करतात. यंदा तर पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाकडून विक्री केंद्र सुरु झ�
अचानक बिबट्याने उंच झेप घेतली. हा बिबट्या त्या गाडीचालकाच्या अंगावर तुटून पडला. गाडीचालकाला पाडून त्यानं पुढील मार्ग शोधला. तोपर्यंत दुचाकीचालक गाडीवरून खाली पडला. तो जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गडचिरोलीचे पालकमंत्रीदेखील हजार किलोमीटर लांब राहतात. त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीची जाण असेलच असे नाही. त्यांनी विशेष करून यात लक्ष द्यावे. हत्ती व कॅम्पच्या संवर्धनासाठी जो काही निधी लागत असेल तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही जांभुळे यांनी केली आहे.