AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले, अनेक विद्यार्थी झाले भावुक

आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक खुर्शीद शेख यांच्या बदलीमुळे शाळेतील विद्यार्थी भावुक झाले. दहा वर्षे शाळेत काम करून, शाळेची पटसंख्या वाढवून आणि तिला मुख्यमंत्री आदर्श शाळाचा दर्जा मिळवून देऊन त्यांनी अद्भुत काम केले आहे.

आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले, अनेक विद्यार्थी झाले भावुक
आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 8:46 PM

गडचिरोली जिल्ह्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षकांच्या बदलीनंतर विद्यार्थी रडू लागले. खुर्शीद शेख नावाच्या शिक्षकाने 10 वर्षाच्या कालावधीत अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषद आसरअली येथील शाळेत अनेक विद्यार्थी भावूक झाले. ब्रिटिशांनी स्वतंत्र्याआधी 1914 मध्ये सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथे ही जिल्हा परिषद शाळा सुरु केली होती. या आसरअली जिल्हा परिषद शाळेला 110 वर्ष पूर्ण झाले आहेत. खुर्शीद शेख हे शिक्षक इथे येण्याआधी या शाळेत जवळपास 74 विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. शिक्षकांच्या मेहनतीमुळे सध्या या शाळेत 232 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षकाची नियुक्ती 2014 मध्ये करण्यात आल्यानंतर त्यांनी 10 वर्ष मेहनत घेत शाळेला मुख्यमंत्री आदर्श शाळेच्या क्रमांक पटकावून दिला

गेल्या 10 वर्षात खुर्शीद शेख यांनी या अति संवेदनशील नक्षलग्रस्त भागातील शाळेला डिजीटल शाळा म्हणून जिल्ह्यासह विदर्भात ओळख निर्माण केली. याची राज्य सरकारने दखल घेत राष्ट्रपती आदर्श पुरस्कार खुर्शीद शेख यांना प्रदान करण्यात आला. यानंतर शासनाने शेख यांची बदली नागेपली जवळील एका शाळेत करण्यात आली आहे.

बदलीनंतर विद्यार्थ्यांना न सांगताच शिक्षक निघून गेले

माझी बदली झाली हे विद्यार्थ्यांना कळाल्यास विद्यार्थी शाळेतून जाण्यास सोडणार नाही म्हणून न सांगताच खुर्शीद शेख यांनी शाळेला निरोप दिला. एक महिन्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शेख शिक्षकांचे स्थलांतर झाल्याची बातमी कळल्यानंतर अनेक विद्यार्थी भावुक होऊन रडू लागले.

हे सुद्धा वाचा

‘ते आमचे शिक्षक नाही तर आमचे बाबा’

चिमुकल्यांनी ते आमचे शिक्षक नाही तर आमचे बाबा होते. त्यांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम आणि आदर्श शिक्षण दिलं. तसेच त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं, अशी प्रतिक्रिया चिमुकल्यांनी दिली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थिंनीना खूप रडू येत होतं. दरम्यान, या शाळेत आता काम करणारे शिक्षकही शेख यांना एक आदर्श शिक्षक मानायचे. खुर्शीद शेख यांची बदली झाली. पण त्यांचे प्रेम नेहमीच आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनात राहणार आहे.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....