AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?

IPL 2026 Updates : दुखापत आणि इतर कारणांमुळे एकाच दिवशी 3 खेळाडूंना आयपीएलच्या 19 व्या मोसमाला मुकावं लागल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या या 3 खेळाडूंचं सीएसके कनेक्शन.

IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?
Dewald Brevis and Matheesha PathiranaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 20, 2026 | 9:01 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. यंदा बीसीसीआयने विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमुळे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. या 19 व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आणखी काही दिवस आहेत. मात्र त्याआधीच काही संघांना झटके लागायची सुरुवात झाली आहे.गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्यांचा प्रमुख आणि मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूड याच्याशिवाय मोहिमेची सुरुवात करावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे. तर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यालाही सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. या दोघांचं न खेळण्यामागील कारण म्हणजे दुखापत.

पॅट आणि जोश या दोघांचा गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीसोबत संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या दोघांना 19 व्या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळता येणार नाहीय. तर दुसऱ्या बाजूला काही असे दुर्देवी खेळाडू आहेत ज्यांना दुखापतीमुळे या मोसमातूनच बाहेर व्हावं लागलंय. कहर म्हणजे एकाच दिवसात 3 खेळाडूंचा दुखापतीमुळे या हंगामातून बाजार उठला आहे. या तिघांनी एकूण रक्कम ही 22 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे. ते तिघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

नॅथन एलिसचा ‘गेम’

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान या 3 संघांना झटका लागला आहे. सीएसकेचा बॉलर नॅथन एलिस याला बाहेर व्हावं लागलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी एलिसचा दुखापतीने गेम केलाय. मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सीएसकेचे सीओ काशी विश्वानथन यांनी नॅथन हॅमस्ट्रिंगमुळे नॅथन खेळण्यास समर्थ नसल्याचं सांगितलं. नॅथन एलिससाठी सीएसकेने 2 कोटी मोजले आहेत.

सॅम करन

तसेच फक्त नॅथनच नाही तर आणखी 2 गोलंदाजांचा दुखापतीने कार्यक्रम केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन याला संपूर्ण मोसमाला मुकावं लागू शकतं. ग्रोईन इंजरीमुळे सॅमला खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. सॅमला राजस्थानने सीएसकेकडून ट्रेडद्वारे 2.4 कोटी रुपये इतकी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमला या वर्षी राजस्थानकडून पदार्पण करता येणार नाहीय.

मथीशा पथीराणा

केकेआरचा वेगवान गोलंदाज मथीषा पथीराणा दुखापतीनंतर अजूनही फिट झालेला नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मथीशाला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी दिलेली नाही. त्यामुळे मशीथाचंही या मोसमात खेळणं अवघड असल्याचं चित्र आहे. केकेआरने मथीशासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. मथीशाला नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.

तिघांचं सीएसके कनेक्शन

योगायोग म्हणजे या तिन्ही खेळाडूंचं सीएसके कनेक्शन आहे. सीएसकेने सॅमला राजस्थानसह ट्रेड केलं. तर मथीशाला करारमुक्त केल्यानंतर केकेआरने त्याला आपल्या गोटात घेतलं. तर नॅथन एलिस सीएसकेसह कायम आहे.

Follow Us
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?