AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाचा आणखी एक दौरा फिक्स, सूर्यासेना टी 20i मालिका खेळणार, कुणा विरुद्ध?

India Tour Of Ireland 2026 : टीम इंडिया आयपीएलच्या 19 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया त्याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. जाणून घ्या टीम इंडियाच्या आयर्लंड विरूद्धच्या नियोजित मालिकेचं वेळापत्रक.

Team India : टीम इंडियाचा आणखी एक दौरा फिक्स, सूर्यासेना टी 20i मालिका खेळणार, कुणा विरुद्ध?
Team India National AnthemImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 20, 2026 | 3:50 AM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाचा हा सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप ठरला. त्यानंतर 28 मार्चपासून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप निमित्ताने आपल्या देशासाठी एकत्र खेळणारे खेळाडू आता आयपीएलमध्ये विविध संघातील खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहेत. टीम इंडियाचा आयपीएलनंतर इंग्लंड दौरा नियोजित आहे. अशात आता टीम इंडियाचा नवा दौरा निश्चित झाला आहे.

टीम इंडिया आयपीएलची सांगता झाल्यानंतर जून महिन्यात आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. आयर्लंड क्रिकेटचे अधिकारी ग्राहम वेस्ट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पॉल स्टर्लिंग याने आयर्लंडच्या टी 20i संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताच्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. नियोजित मालिकेनुसार टीम इंडिया या दौऱ्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा भरगच्च असा आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर याआधी टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांत्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या या भारत दौऱ्याची सांगता 20 जून होणार आहे.

टीम इंडिया-आयर्लंड

दरम्यान टीम इंडिया गेल्या 7 वर्षांत 3 वेळा आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यात पहिल्यांदाच 2008 साली आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात आली.  त्यानंतर टीम इंडिया 2022 आणि 2023 साली आयर्लंड विरुद्ध खेळली होती. आयर्लंड टीम इंडियाच्या तुलनेत लिंबुटिंबु आहे. मात्र आयर्लंडने अनेक संघांना उलटेफरचा शिकार केला आहे. त्यामुळे सूर्यासेना या संघाला गृहीत धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे आयर्लंड या मालिकेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला