Nashik | कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
नेते आणि अनेक सेलिब्रिटींचे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदनगर परिसरातील त्यांच्या आलिशान बंगल्यातील घटनांमुळे पत्रकारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅप्टन खरात यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबाकडून पत्रकारांवर दमदाटी करण्यात आली असल्याची तक्रार समोर आली आहे.
नेते आणि अनेक सेलिब्रिटींचे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदनगर परिसरातील त्यांच्या आलिशान बंगल्यातील घटनांमुळे पत्रकारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅप्टन खरात यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबाकडून पत्रकारांवर दमदाटी करण्यात आली असल्याची तक्रार समोर आली आहे. TV9 च्या टीमने या बंगल्यात वार्तांकन करण्यासाठी भेट दिली असता, कॅप्टन खरात यांच्या घरातून आलेल्या एका व्यक्तीने कॅमेरा आणि मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला, तसेच पत्रकारांना धमकावण्याचा देखील प्रकार समोर आला. या घटनांमुळे पत्रकारांमध्ये चिंता वाढली असून, या प्रकारामुळे घराबाहेर किंवा परिसरात वार्तांकन करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. पोलिसांनी सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील कारवाई करण्याची तयारी केली आहे.
Published on: Mar 19, 2026 03:55 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

