AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

34 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा, आता होतोय यूट्यूबवर ट्रेंड! एका सीनमध्ये तर… तुम्ही पाहिला आहे का?

या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती आणि आजही ती तितक्याच आवडीने ऐकली जातात. सुमारे 34 वर्षांनंतरही हा चित्रपट यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.

| Updated on: Mar 20, 2026 | 12:00 AM
Share
90 च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 1992 साली प्रदर्शित झालेला 'बेटा'. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे.

1 / 5
सुमारे 2 तास 51 मिनिटांचा हा चित्रपट त्या काळातील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला होता. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंदर कुमार यांनी केले होते. चित्रपटात अरुणा इराणी, अनुपम खेर आणि कुनिका यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा प्रामुख्याने एका कुटुंबाभोवती फिरते. ज्यात सावत्र आई आणि मुलगा यांच्यातील नात्याची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.

2 / 5
कथेनुसार, अनिल कपूरने साकारलेली राजू ही भूमिका श्रीमंत घरातील मुलगा असते. त्याच्या आईचे लहानपणीच निधन होते  आणि वडील दुसरे लग्न करतात. सावत्र आई (अरुणा इराणी) स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी राजूला जाणीवपूर्वक अशिक्षित ठेवते आणि त्याला शेतीच्या कामात गुंतवून ठेवते. ती आपल्या मुलासाठी उच्च शिक्षणाची सोय करते तर राजूसाठी अशिक्षित मुलगीच सून म्हणून आणण्याचा विचार करते.

3 / 5
मात्र, परिस्थिती बदलते जेव्हा राजूला माधुरी दीक्षितच्या पात्रावर प्रेम होते. पुढे तो तिच्याशी लग्न करून तिला घरी आणतो. यानंतर सावत्र आईला हे मान्य नसल्याने ती त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करू लागते. पुढे कथेत अनेक ट्विस्ट आणि वेगवेगळी वळणे येतात जी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

4 / 5
या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती आणि आजही ती तितक्याच आवडीने ऐकली जातात. सुमारे 34 वर्षांनंतरही हा चित्रपट यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. IMDb वर या चित्रपटाला 6.2 रेटिंग मिळाले आहे. बेटा हा चित्रपट 90 च्या दशकातील एक क्लासिक चित्रपट ठरला असून आजही प्रेक्षकांच्या मनात त्याचे विशेष स्थान आहे.

5 / 5
Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल