Nanded | हळद शिजवताना कुकरचा स्फोट,  शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी, दोन मुले आणि अन्य एकजण जखमी

| Updated on: Apr 21, 2022 | 2:08 PM

नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer death) झाला तर तीन जण जखमी झाले. मुखेड तालुक्यातील (Mukhed ) दापका गुंडोपंत गावात ही दुर्दैवी घटना घडली. हळद शिवजवाताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. हा नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी शेतकरी तरुण कुकरजवळ गेले, त्यावेळी कूकरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट (Cooker […]

Nanded | हळद शिजवताना कुकरचा स्फोट,  शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी, दोन मुले आणि अन्य एकजण जखमी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Farmer death) झाला तर तीन जण जखमी झाले. मुखेड तालुक्यातील (Mukhed ) दापका गुंडोपंत गावात ही दुर्दैवी घटना घडली. हळद शिवजवाताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. हा नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी शेतकरी तरुण कुकरजवळ गेले, त्यावेळी कूकरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट (Cooker blast) एवढा भयंकर होता की, कूकरचे तुकडे दूर अंतरावर जाऊन पडले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

दापका गुंडोपंत गावातील घटना

मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत गावात ही दुर्दैवी घटना घडली. कच्ची हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती होऊ लागली त्यामुळें कुकर मधून हवा सोडण्यात येऊ लागली त्याचवेळी कुकरचा अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटात 28 वर्षीय सुनील मारवाड याचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीलची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलासहित अन्य एक मजूर असे तिघेजण जखमी झाले आहे. या जखमींवर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रमाकांत कागणे या शेतकऱ्याची आत्महत्या

मुखेडः व्हिडिओ व्हायरल करत शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, अन्य एका घटनेत मुखेड तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. रमाकांत कागणे या 38 वर्षीय शेतकऱ्यांने स्वतःचा व्हीडिओ व्हायरल करत गळफास घेत आत्महत्या केली . नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हिब्बट या गावातील घटना आहे. या शेतकऱ्यांने स्वतःचा व्हीडिओ बनवत व्हाउरल केला आणि त्यानंतर आज सकाळी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. स्वतःचा भाऊ आणि वहिनी संपत्तीत हिस्सा देत नसल्याच्या कारणावरून आत्महत्या करत असल्याचा दावा या व्हीडिओ त शेतकऱ्याने केलाय.

इतर बातम्या-

Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा

‘या’ आहेत भारतातील, सर्वात सुरक्षित कार: यांना मिळाले ‘क्रॅश चाचणी’ त 5 स्टार रेटिंग !