Nandurbar | नंदूरबार जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचं विभाजन, नव्या 45 ग्रामपंचायतींची निर्मती, पालमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: May 16, 2022 | 4:31 PM

जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नविन 45 ग्रामपंचायती स्थापन करण्याचा ठराव जिल्हा परिषदे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाला पाठवण्यात आला. अखेर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचं विभाजन झालं असून आता येथील विकासातील अनेक अडथळे दूर होतील, अशी नागरिकांना आशा आहे.

Nandurbar | नंदूरबार जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचं विभाजन, नव्या 45 ग्रामपंचायतींची निर्मती, पालमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us on

नंदुरबार : नंदूरबार (Nandurbar) हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेला जिल्हा असून राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश नंदुरबार जिल्ह्यात आहे. मोठ्या क्षेत्रफळाच्या ग्रुप ग्रामपंचायतीमुळे (Gram Panchayat) विकास कामांना गती मिळत नव्हती. त्यामुळे पालकमंत्री के सी पाडवी (K C Padvi) यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील एकूण 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नविन 45 ग्रामपंचायती स्थापन करण्याचा ठराव जिल्हा परिषदे मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाला पाठवण्यात आला. अखेर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचं विभाजन झालं असून आता येथील विकासातील अनेक अडथळे दूर होतील, अशी नागरिकांना आशा आहे.

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून विभाजन

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने जून -2020 ते मार्च -2021 या कालावधीत ठराव घेऊन विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे  14 सप्टेंबर 2021 रोजी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या  सुचनेनुसार 23 सप्टेंबर 2021 रोजी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला.अशी माहिती त्यांनी दिली माननीय पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने नंदुरबार जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतींचे विभाजन करून नवीन 45 ग्रामपंचायती निर्मिती झाली असून यात सर्वाधिक  ग्रामपंचायती धडगाव तालुक्यातील आहे. मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्याने समाधान व्यक्त केले जात असून   धडगाव आणि अक्कलकुवा  तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य यांनी केलेल्या मागणीचा पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी स्वतः लक्ष घातले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठ पुराव्याचे यश आसल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री के.सी पाडवी यांनी  दिली आहे .

विभाजन होणाऱ्या ग्रामपंचायती-

धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायती

1. मांडवी बु. 2. भुषा 3. राजबर्डी 4. तोरणमाळ 5. रोषमाळ 6. गेंदा

7. चिंचकाठी 8. बिजरी 9. चिखली 10. कात्री

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत

1. उमरागव्हाण

नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायत 

1. करंजवेल

2. पाटी बेडकी

 नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत

1. राकसवाडे

 शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत 

1. कलमाडी त.बो.