मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा; म्हणाले, हे तर शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार…

| Updated on: Mar 12, 2024 | 8:10 PM

Nana Patole on CM Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणी साधला निशाणा? नंदुरबारमध्ये बोलताना काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे सरकारवरही त्यांनी निशामा साधला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असल्याचं ते म्हणालेत. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा; म्हणाले, हे तर शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार...
CM Eknath Shinde
Follow us on

गौतम बैसाने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नंदुरबार | 12 मार्च 2024 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात आणि देशात बसलेल्या भाजप सरकार ची अवस्था बिकट होणार आहे. इंडिया आघाडीसोबत राहुल गांधी पुन्हा देश गाजवतील.राज्याच्या मुख्यमंत्री खोका आणि बोका असल्याचे टीका नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्राची सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातली सरकार आहे. भाजपचं सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, असं नाना पटोले म्हणाले. पटोले यांनी भारत जोडो न्याय यात्रेवरही भाष्य केलं.

“हे तर देश विकायला निघाले”

महायुतीची ज्या काय पद्धतीने आपण पाहत आहे. एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो भाजप कोणाला पुढे जाऊ देत नाही आहे. भाजपाचे मुठभर मित्र हेच खरे देशाची लाभार्थी आहेत, लाभ घेत आहेत. हे देश विकायला निघाले आहेत. धीरज देशमुख यांनी बरोबर सांगितलं आहे. भाजप देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे धीरज देशमुख यांनी जे सांगितलं ते योग्य आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

भारत जोडो यात्रेमुळे लोकांना न्याय- पटोले

भारत जोडो यात्रेमुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या काम करत आहे. भारत जोडो यात्रेची दखल भाजप घेत आहे याचा अर्थ भाजप घाबरला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रामुळे भाजप घाबरला आहे. आपल्या देशावर ज्या ज्या वेळेस संकटाला आहे. त्यावेळेस महात्मा गांधी, असतील भगवान श्री राम, तथागत गौतम बुद्ध, ऋषीमुनी या या देशातला पद पदग्रामीण केला आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा आहे. लोकांना न्याय देण्यासाठी निघाले आहे. भारतातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे. यासाठी योद्धा राहुल गांधी, महाराष्ट्रात आले आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

भारत जोडो यात्रेवर भाष्य

महाराष्ट्र राहुल गांधींच्या स्वागतासाठी तयार आहे. न्याय हक्कांच्या लढाईसाठी अन् राहुल गांधींच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. वाईट प्रवृत्तीची होळी आज राहुल गांधी पेटवणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राहुल गांधी करणार आहेत. राहुल गांधी शिवभक्त आहेत. राहुल गांधी शिवभक्त आहेत. हे कळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्र्यंबकेश्वरला राहुल दर्शन घेणार आहेत. त्यानंतर भरतो जोडो यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे. भाजप केंद्रात 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही. परिवर्तनाची लाट देशात आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भारत जोडो यात्रेवर भाष्य केलंय.