Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक; काय आहे आजचा रिपोर्ट?

| Updated on: Jan 15, 2022 | 12:01 PM

नाशिकमध्ये कोरोना चाचणी केलेले अहवाल चार-चार दिवस मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रत्यक्षात किती तरी पटीने वाढ झाल्याची भीती व्यक्त होताना दिसत आहे.

Nashik Corona | नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक; काय आहे आजचा रिपोर्ट?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये कोरोना (Corona) रुग्णांचा अक्षरशः उद्रेक झाला असून, रुग्णांची संख्या चक्क 9 हजारांच्या घरात गेली आहे. सर्वाधिक जवळपास 7 हजार रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात आहेत. सोबतच निफाड, दिंडोरी, सिन्नर तालुक्यातही रुग्णवाढ होत आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये कोरोना चाचणी केलेले अहवाल चार-चार दिवस मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रत्यक्षात किती तरी पटीने वाढ झाल्याची भीती व्यक्त होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

महापालिका क्षेत्रात रुग्णवाढ

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 9 हजार 277 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 8 हजार 721 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. आज उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 133, बागलाण 34, चांदवड 19, देवळा 16, दिंडोरी 233, इगतपुरी 46, कळवण 36, मालेगाव 20, नांदगाव 68, निफाड 461, पेठ 4, सिन्नर 110, सुरगाणा 20, त्र्यंबकेश्वर 21, येवला 29 असे एकूण 1 हजार 250 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 6 हजार 940, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 168 तर जिल्ह्याबाहेरील 363 रुग्ण असून असे एकूण 8 हजार 721 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 26 हजार 764 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 63, बागलाण 11, चांदवड 11, देवळा 2, दिंडोरी 43, इगतपुरी 36, कळवण 8, मालेगाव 17, नांदगाव 26, निफाड 73, सिन्नर 34, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 11, येवला 15 असे एकूण 351 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.58 टक्के, नाशिक शहरात 95.80 टक्के, मालेगावमध्ये 95.47 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनाने आतापर्यंत 4 हजार 252 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 30, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 766 रुग्णांचा मृत्यt झाला आहे.

ठळक घडामोडी अशा…

– 4 लाख 26 हजार 764 कोरोनाबाधित रुग्ण.

– नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 6 हजार 940 रुग्ण.

– मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 168 रुग्ण.

– 4 लाख 9 हजार 277 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 8 हजार 721 पॉझिटिव्ह रुग्ण

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.90 टक्के.

इतर बातम्याः

Nashik | दिक्काल धुक्याच्या वेळी, प्राणांवर नभ धरणारे; कोविड अनाथांवर प्रशासनाच्या मायेची पाखर!

Nashik | निवडणुकीत तेरावा; 159 झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी सर्वपक्षीय खटाटोप, पुढे काय होणार?

Nashik ZP| झेडपी निवडणूक लांबणीवर पडणार; पण मुदतवाढ न मिळता प्रशासक येण्याचे संकेत, कारण काय?