नाशिकः नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. खरे तर महापालिकेकडे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारल्याची माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. यामुळे सबंध उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.