AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाच्या सीटचा रंग नेहमी निळाच का असतो? एअर होस्टसने सांगितलं धक्कादायक सत्य, ऐकून तुम्हालाही बसेल मोठा झटका

तुम्ही कधीतरी विमानाने प्रवास केलाच असेल, काही जण तर अनेकदा विमानाने प्रवास करतात. मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की विमानाच्या सीटचा रंग हा नेहमी निळाच का असतो? त्या मागे नेमकं काय कारण आहे.

विमानाच्या सीटचा रंग नेहमी निळाच का असतो? एअर होस्टसने सांगितलं धक्कादायक सत्य, ऐकून तुम्हालाही बसेल मोठा झटका
PlanesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 9:27 PM
Share

अनेकांचं आपल्या आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. तर काही जण असे देखील असतात जे दररोज किंवा महिन्यातून अनेक वेळा विमानाने प्रवास करतात. तुम्हीही विमानाने प्रवास केलाच असेल. तुम्ही जेव्हा विमानामध्ये प्रवेश करता, तेव्हा सर्वात आधी तुम्ही आपलं सीट शोधता आणि त्यानंतर आपल्या आरक्षित सीटवर जाऊन बसतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की तुम्ही कोणत्याही विमाने प्रवास करा, प्रत्येक विमानाच्या सीटचा रंग हा निळाच का असतो? या मागे काही विज्ञान आहे की, हे पूर्वीपासून असंच चालत आलं आहे? आज या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

याबाबत एका एअर होस्टेसने माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विमानातील प्रत्येक सीट निळ्या रंगाचेच का असते? तर त्यामागे तीन प्रमुख कारण आहेत, पहिलं कारण म्हणजे मेंटेनंस, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मानसशास्त्र आणि तिसरं ब्रँडिंग. कोणत्याही विमानाच्या उड्डाणापूर्वी एअर लाईन्सच्या स्टाफकडे अत्यंत कमी वेळ असतो. खासकरून जेव्हा विमानाचा प्रवास हा कमी वेळेचा असतो, आणि त्यानंतर लगेचच उड्डाण करायचं असतं, अशा स्थितीमध्ये एक विमान दिवसभरात अनेक चकरा मारतं. मग वेळ कमी असल्यामुळे विमानाच्या सीटला पडलेले डाग किंवा खराब झालेले सीट हे लवकर नजरेस पडावे, जास्त श्रम वाया न जाता, त्याची लगेचच स्वच्छता व्हावी यासाठी विमानाचं सीट हे निळ्या रंगाचं असतं.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकजण पहिल्यांदाच विमानानं प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी विमानाचा प्रवास हा खूपच रोमाचंकारी असतो. मात्र विमानाने उड्डाण करताच त्यांना भीती देखील वाटते. विमानाच्या उड्डाणावेळी आणि लँडिंगवेळी त्यांना भीती वाटते. अशा स्थितीमध्ये रंगाचा तुमच्या मनावर देखील परिणाम होत असते. निळा रंग हा सर्व सामान्यपणे भरोसा आणि शांतीचं प्रतिक आहे. यामुळे प्रवाशांना धीर मिळतो, त्यामुळे विमानाचे सीट हे नेहमी निळ्या रंगाचेच असतात.

सोबतच निळा रंग हा डोळ्यांना देखील चांगला वाटतो. मनाला शांत ठेवण्याचं काम करतो. निळा रंग मुळातच आकर्षित असतो. त्यामुळे विमान देखील आकर्षित दिसतं आणि विमानाचं ब्रँडिंग होण्यास मदत होते.

Follow Us
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.