AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा

अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल अभिनेत्री लारा दत्ता हिचा थक्क करणारा खुलासा... सुरुवातीचे दिवस आठवत अभिनेत्री म्हणाली, 'अक्षय मुलींचा गैरफायदा...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

मुलींचा गैरफायदा घेणं...! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
Akshay Kumar
| Updated on: Apr 11, 2026 | 12:25 PM
Share

अभिनेता अक्षय कुमार याला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. आज अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या भारतातच नाही तर, भारताबाहेर देखील फार मोठी आहे… पण 2003 हे वर्ष फक्त अभिनेत्यासाठीच नाही तर, सिनेविश्वासाठी फार खास ठरला. कारण याच वर्ष अभिनेत्री लारा दत्त आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी ‘अंदाज’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, त्याकाळात नवे कलाकार विशेषतः अभिनेत्रींचा गैरफायदा घेण्याच्या चर्चा कायम सुरु असायच्या… अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत लारा हिने अभिनेता अक्षय कुमार याच्याबद्दल मोठा खुलासा केला…

नुकताच झालेल्या मुलाखतीत, लारा हिने करियरयच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं, जेव्हा लारा आणि प्रियांका बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. लारा म्हणते. ‘प्रियांका आणि मी एकत्रच इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.. तेव्हा आमच्या दोघींचं वय फार कमी होतं… पण स्वप्न मोठी होती… पण योग्य मार्ग दाखवणारा गॉडफादर आमच्याकडे नव्हता… अशात अक्षय कुमार याने आमचा गैरफायदा घेण्याऐवजी आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे मार्ग दाखवला…’

अक्षय कुमार याचं कौतुक करत लारा म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये जेव्हा तुम्ही नवीन असता, तेव्हा स्वतःला सुरक्षित ठेवणं फार कठीण असतं… अशात अक्षयने आमच्या असहायतेचा किंवा अननुभवीपणाचा कधीच गैरफायदा घेतला नाही. उलट, त्याने आमच्या सभोवतालचं वातावरण सुरक्षित राहील आणि आमचं कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही याची काळजी घेतली.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

लारा, अक्षय आणि प्रियांका यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिघांनी ‘अंदाज’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. लाराने सिनेमात काजल ही भूमिका पार पाडली होती आणि त्या सिनेमासाठी अभिनेत्रीला बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. एवढंच नाही तर, प्रियांका हिचा ‘हिरो’ सिनेमा आधीच प्रदर्शित झालेला.

लारा दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री ‘रामायण’ आणि ‘वेलकर टू द जंगल’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील लारा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.