AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR Qualifier 2 Live Streaming : गुजरात-राजस्थान क्वालिफायर 2 साठी सज्ज, सामना किती वाजता? जाणून घ्या

Gujarat Titans vs Rajasthan Royals Qualifier 2 IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांकडे अंतिम फेरीत पोहचण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ फायनलचं तिकीट फायनल करणार आणि ट्रॉफीवर 1 हात ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

GT vs RR Qualifier 2 Live Streaming : गुजरात-राजस्थान क्वालिफायर 2 साठी सज्ज, सामना किती वाजता? जाणून घ्या
GT vs RR IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 29, 2026 | 1:43 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? याचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना येत्या काही तासांतच मिळणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 2 सामना (Qualifier 2) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने 2 युवा भारतीय कर्णधार आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर रियान पराग याच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. आता दोघांपैकी कोणता संघ फायनलमध्ये पोहचणार? याची उत्सूकता चाहत्यांना लागून आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना शुक्रवारी 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/ipl या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघांची साखळी फेरीतील कामगिरी

दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांनी साखळी फेरीत प्रत्येकी 14-14 सामने खेळले आहेत. गुजरातने 14 पैकी 9 सामने जिंकले. तर गुजरातला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. गुजरातने साखळी फेरीनंतर दुसरं स्थान पटकावलं. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट मिळवलं. राजस्थानने 14 पैकी 8 सामने जिंकले. तर राजस्थानला 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा