AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...

दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच…

| Updated on: Oct 16, 2026 | 5:12 PM
Share

दिल्ली पोलिसांनी लहरा दो तिरंगा मार्चपूर्वी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. कॅनॉट प्लेसमध्ये रॅलीसाठी जमलेल्या आंदोलकांनी या प्रतिबंधात्मक कारवाईचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी वाहतूक नियमावलीचे कारण देत दिपके यांना सेंट्रल पार्कमध्ये पोहोचण्यापासून रोखले.

दिल्लीत लहरा दो तिरंगा मार्च काढण्याच्या तयारी असतानाच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. कॅनॉट प्लेस परिसरातील त्यांच्या घरातून बाहेर पडताच पोलिसांनी ही कारवाई केली. सेंट्रल पार्क येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, जिथे मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. मात्र, दिपके यांना घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले. पोलिसांनी ही कारवाई प्रतिबंधात्मक असल्याचे सांगितले आहे.

वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेल्या नियमावलीचा हवाला देत, कॅनॉट प्लेस, संसद मार्ग, मंडी हाऊस आणि इंडिया गेट परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले. आंदोलकांनी मात्र या कारवाईला घटनेची हत्या आणि लोकशाहीवर हल्ला असे संबोधत तीव्र निषेध व्यक्त केला. एका आंदोलकाने, “आपल्याच देशात आपला तिरंगा फडकवणे हा कोणता गुन्हा आहे?” असा सवाल उपस्थित केला. दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले असून, त्यांना नेमके कुठे नेण्यात आले आहे, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिपके यांना नोटीस बजावली होती.

Published on: Oct 16, 2026 05:12 PM

Follow Us