AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा

Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा

| Updated on: Oct 16, 2026 | 2:17 PM
Share

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने त्यांची बहुचर्चित रोडस्टर ही नवी इलेक्ट्रिक कार जगासमोर सादर केली आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वाको परिसरात आयोजित कार्यक्रमात एलॉन मस्क यांनी या कारची पहिली झलक दाखवली. या कारमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने त्यांची बहुचर्चित रोडस्टर ही नवी इलेक्ट्रिक कार जगासमोर सादर केली आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वाको परिसरात आयोजित कार्यक्रमात एलॉन मस्क यांनी या कारची पहिली झलक दाखवली. या कारमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्लाने दावा केला आहे की, या आगामी रोडस्टरमध्ये थेट रॉकेट थ्रस्टर्स बसवण्यात आले आहेत. स्पेस-एक्स कंपनीचे हे रॉकेट थ्रस्टर्स असल्यामुळे ही कार हवेतही उडू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

आतापर्यंत हवेत उडणाऱ्या कारबाबत केवळ कल्पनाच केली जात होती, मात्र टेस्लाने हे संशोधन प्रत्यक्ष जगासमोर आणले आहे. बॅटरीवर चालणारी ही कार अवघ्या ०.८१ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रतितास वेग गाठू शकते. कामगिरीच्या बाबतीत ही कार इतर कारच्या तुलनेत वेगळ्याच स्तरावर पोहोचेल अशी शक्यता आहे. परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट या तीन आवृत्त्यांमध्ये ही कार उपलब्ध होण्याची माहिती आहे. २०२८ पासून या नव्या कारचे उत्पादन सुरू होईल असे मस्क यांनी सांगितले आहे.

Published on: Oct 16, 2026 02:17 PM

Follow Us