AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय

गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय

| Updated on: Oct 16, 2026 | 3:33 PM
Share

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देत पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे पडळकर यांना आता निवडणूक लढवता येणार आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेला निर्णय स्थगित करत पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांना आता सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. या प्रकरणात, जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता.

बँकेच्या पोटनियमांनुसार पडळकर यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. सावंत यांच्यासोबत मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर शिंदे यांनी खंडपीठाकडे धाव घेतली होती. खंडपीठाने अर्ज अवैध ठरवल्यानंतर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज सकाळी या प्रकरणावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर खंडपीठाचा निकाल स्थगित करत गोपीचंद पडळकर यांना निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरवले. या निर्णयामुळे पडळकर यांच्या राजकीय मार्गातील एक महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

Published on: Oct 16, 2026 03:33 PM

Follow Us