AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. यापूर्वीही त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आडवाणींच्या आरोग्याबद्दल सध्या कोणतीही चिंता नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मोठी बातमी ! लालकृष्ण आडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात भरती, काय झालं नेमकं?
l k advaniImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 11:07 PM
Share

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना आज संध्याकाळी उशिरा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडवाणी यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. वैद्यकीय सूत्रांच्या मते, आज संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आडवाणी यांना रुग्णालायत आणण्यात आलं. त्यांना पल्मोनरी डिपार्टमेंटमध्ये भरती करण्यात आलं होतं. या ठिकाणी फुफ्फुस आणि श्वासाशी संबंधित आजारांवर उपचार केले जातात.

अपोलो रुग्णालयाच्या पल्मोनरी डिपार्टमेंटमध्ये आडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचं एक पथक नजर ठेवून आहे. यापूर्वीही याच वर्षी मे महिन्यात आडवाणी यांना अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आताही त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात आणलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

मोदींनी घेतली होती भेट

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांचे आशीर्वाद घेतले होते. मोदींनी एक्सवरून ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतील पदावर राहून 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आडवाणी यांच्या देशाच्या योगदानाबद्दलचं कौतुक केलं होतं. देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नेत्यांपैकी आडवाणी एक होते, असं मोदींनी म्हटलं होतं.

तीनदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

लालकृष्ण आडवाणी तीनवेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1986 ते 1990, त्यानंतर 1993 ते 1998 आणि तिसऱ्यांदा 2004 ते 2005 पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आडवाणी यांच्या नेतृत्वातच भाजपची ताकद वाढली होती. 1984मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार होते. 1989 मध्ये भाजपने 85 जागा जिंकल्या होत्या. 1996 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार आलं होतं. या सरकारमध्ये आडवाणी 1998 ते 2004 पर्यंत केंद्रीय गृह मंत्री आणि 2002 ते 2004 पर्यंत उपपंतप्रधान होते. त्यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं होतं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा