AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून…

| Updated on: Oct 16, 2026 | 3:17 PM
Share

दिल्लीतील करोल बाग परिसरात अभिजीत दिपके यांच्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आहे. तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर, त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, कनॉट प्लेसमध्ये कलम १६३ लागू असल्याने आंदोलनाला परवानगी नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एनडीएमसीकडूनही आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही.

दिल्लीतील करोल बाग परिसरातील अभिजीत दिपके यांच्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी धाव घेतली आहे. दिपके यांच्या नियोजित तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मागील अर्ध्या तासापासून पोलीस दिपके यांच्या मित्राच्या निवासस्थानी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. पोलिसांनी अभिजीत दिपके यांना नोटीस बजावली आहे, ज्यात कनॉट प्लेस परिसरात कलम १६३ लागू असल्याने कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी नसल्याचे नमूद केले आहे.

दिपके यांनी सेंट्रल पार्कमध्ये आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती, मात्र एनडीएमसीनेही त्या परिसरासाठी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. यामुळे दिपके यांना आंदोलन करता येणार नाही, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. अभिजीत दिपके यांनी आदल्या दिवशीच त्यांना रॅलीपूर्वी अटक होण्याची शक्यता वर्तवली होती. सध्या दिपके आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असून, नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 16, 2026 03:17 PM

Follow Us