AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RR Qualifier 2 : गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?

IPL 2026 GT vs RR Qualifier 2: गुजरात टायटन्सकडे क्वालिफायर 1 सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये सुरक्षितरित्या पोहचण्याची संधी होती. मात्र गुजरातने ही संधी गमावली. आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवत पहिल्याच झटक्यात फायनलमध्ये धडक दिली. मात्र गुजरातला पराभवानंतर अंतिम फेरीसाठी आणखी 1 संधी आहे.

GT vs RR Qualifier 2 : गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?
IPL 2026 GT vs RR Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 29, 2026 | 2:09 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शुक्रवारी 29 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आधीच फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे क्वालिफायर 2 सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो याकडे आरसीबी आणि क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. क्वालिफायर 2 सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांची एकमेकांविरूद्धची आकडेवारी जाणून घेऊयात.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरात टायटन्सने या 10 पैकी 7 सामन्यांत राजस्थानचा धुव्वा उडवला आहे. तर राजस्थानला गुजरात विरुद्ध केवळ 3 सामन्यांतच यश मिळवता आलं आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता गुजरातच राजस्थानवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.

गुजरात दुसऱ्या संधीचं सोनं करणार?

राजस्थानने एलिमिनेटरमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर गुजरातला टॉप 2 मध्ये असल्याने क्वालिफायर 1 मधील पराभवानंतरही अंतिम फेरीसाठी अतिरिक्त संधी मिळाली आहे. मात्र गुजरातसाठी ही दुसरी आणि शेवटची संधी असणार आहे. आरसीबीने क्वालिफायर 1 मध्ये गुजरातचा पराभव करुन फायनलचं तिकीट मिळवलंय. त्यामुळे आता गुजरात दुसऱ्या संधीचा फायदा घेण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्यांदा कोण मिळवणार फायनलचं तिकीट?

राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघ स्पर्धेच्या इतिहासात एकूण 2 वेळा अंतिम फेरीत पोहचले आहेत. राजस्थान याआधी 2008 आणि 2022 साली फायनलमध्ये पोहचली आहे. तर गुजरातने 2022 आणि 2023 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरणार? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

दोन्ही संघ 19 व्या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान क्वालिफायर 2 निमित्ताने गुजरात आणि राजस्थान दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळा भिडले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा