AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar | बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक

Chhatrapati Sambhajinagar | बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक

| Updated on: May 28, 2026 | 4:48 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 68 वर्षीय महिला डॉक्टरची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सही करून डॉक्टरांच्या बँक खात्यातून 9 लाख रुपये काढण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 68 वर्षीय महिला डॉक्टरची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सही करून डॉक्टरांच्या बँक खात्यातून 9 लाख रुपये काढण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं असून फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी चेकवर बनावट सही करून संबंधित महिला डॉक्टरांच्या खात्यातून मोठी रक्कम काढली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेत तिच्या घराची झडती घेतली असता तब्बल 9 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
दरम्यान, या फसवणूक प्रकरणात संबंधित बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलीचाही या प्रकरणात वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सध्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Published on: May 28, 2026 04:48 PM

Follow Us
भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि….

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण….

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!.

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी...

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..