AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Roti Bhatti | अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार; व्हिडीओ व्हायरल!

Roti Bhatti | अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार; व्हिडीओ व्हायरल!

| Updated on: May 28, 2026 | 3:42 PM
Share

मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला असून संतोष नगर येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी बनवल्या जाणाऱ्या रोटीवर थुंकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोटी बनवणाऱ्या कामगारासह हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या संतोष नगर भागातील ‘फिश कोळीवाडा’ हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेलमध्ये रोटी बनवताना ती भट्टीत टाकण्यापूर्वी कामगार कच्च्या रोटीवर थुंकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडीओ समोर आल्यानंतर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. कौशार शेख (रोटी बनवणारा कामगार) आणि फैय्याज शेख (हॉटेल मालक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आपण पैसे देऊन खात असलेलं अन्न अशा प्रकारे अस्वच्छ पद्धतीने तयार होत असेल, तर बाहेरचं खाणं किती सुरक्षित?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Published on: May 28, 2026 03:42 PM
Follow Us