मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, बड्या नेत्यांची उपस्थिती
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आता केंद्र सरकार गंभीर झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावर आता केंद्र सरकार गंभीर झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
तसेच NTA चे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटीचे धागेदोरे आणि तपासाची सद्यस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, CBI कडून देशातील विविध राज्यांमध्ये तपास वेगाने सुरू असून अनेक आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या रॅकेटवर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता केंद्र सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Published on: May 28, 2026 02:37 PM
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;

