AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात,  पेपर फुटू नये म्हणून PMO...

केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात, पेपर फुटू नये म्हणून PMO…

| Updated on: May 28, 2026 | 5:13 PM
Share

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी परीक्षेत पुन्हा पेपर लीक होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून लष्करावर परीक्षेच्या पेपरची सुरक्षितता आणि गुप्तता याची जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काही महत्त्वाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक सुरू होती.

ही उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर माहिती समोर आली आहे. या बैठकीत एनटीएचे महासंचालक आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. आता नीट पेपरच्या संपूर्ण प्रक्रियेवर PMO चं लक्ष असेल. इतकेच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचे या संबंध प्रक्रियेवर बारीक लक्ष असणार आहे. आगामी परीक्षा 21 तारखेला घेतली जाणार असून केंद्र शासन अत्यंत सतर्क झाल्याचं दिसतंय.

Published on: May 28, 2026 05:13 PM
Follow Us