Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून या घटनेची राज्यासह देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांमुळे खरात याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “खरात प्रकरणात जे घडले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. हे अतिशय दुर्दैवी असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे,” असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून या घटनेची राज्यासह देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांमुळे खरात याला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांशीही त्याचे संबंध असल्याच्या चर्चांनी या प्रकरणाला अधिकच संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “खरात प्रकरणात जे घडले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. हे अतिशय दुर्दैवी असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे,” असे त्या म्हणाल्या.
तसेच, संसदेतील अनुभव सांगताना सुळे म्हणाल्या की, “देशातील इतर राज्यांतील खासदार दिल्लीत भेटल्यानंतर महाराष्ट्रात काय सुरू आहे, अशी विचारणा करत चेष्टा करतात. ज्या प्रकारे या प्रकरणातील व्हिडीओ समोर येत आहेत, ते अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे.”
या प्रकरणामुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
Published on: Apr 11, 2026 11:50 AM
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे

