AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा

Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा

| Updated on: Jul 13, 2026 | 2:38 PM
Share

कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 24वा दिवस असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाच्या संस्थापकांनी दिला आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गेल्या 24 दिवसांपासून पक्षाकडून उपोषण सुरू असून, आंदोलनकर्त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला आहे. मात्र, एवढे दिवस उलटूनही सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. याबाबत बोलताना अभिजित दिपके म्हणाले, “सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नसेल, तर आम्हाला संसदेपर्यंत जावे लागेल. तिथून तरी आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.”

यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “मोर्चासाठी परवानगी मिळाली तर ठीक, अन्यथा परवानगी न मिळाली तरी आम्ही संसदेवर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत.”

दरम्यान, कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाकडे आणि 20 तारखेला प्रस्तावित संसद मोर्चाबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 13, 2026 02:35 PM

Follow Us