Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून…
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी संबंधित घडामोडींनी राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सुनेने केलेल्या आरोपांमुळे राऊत कुटुंब अडचणीत आले आहे. मानसिक छळ झाल्याचा आरोप करत तिने ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याबाबतही काही गंभीर दावे करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच विनायक राऊत यांना आणखी एक धक्का बसला आहे. गृह विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या संरक्षण शाखेकडून आजी माजी खासदारांना संरक्षण दिलं जातं, असल्यचां सांगितलं जातं. त्यामुळे विभागाच्या निर्णयानुसार त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. संरक्षण शाखा 1 कडून याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वीही संरक्षण काढण्याबाबत अधिकृत पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विनायक राऊत यांनी संरक्षण कायम ठेवण्याची विनंती केली होती. मात्र संबंधित विभागाने ही मागणी मान्य केली नाही. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 13, 2026 02:56 PM
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..