Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
नताशा आव्हाड यांनी डिलिमीटेशन विधेयकातील महिला आरक्षणाच्या मुद्द्याला दिशाभूल करणारे राजकारण म्हटले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले होते, त्यामुळे ते आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात आणणे हेतुपुरस्सर असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप महिला आरक्षणाचा मुद्दा वापरून लोकशाहीवर आघात करणाऱ्या विधेयकाचे समर्थन करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
नताशा आव्हाड यांनी डिलिमीटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी आपल्या ट्विटद्वारे ही टीका केली आहे. त्यांच्या मते, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या चर्चेमध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा आणणे हे केवळ दिशाभूल करणारे आणि हेतुपुरस्सर केलेले राजकारण आहे.
नताशा आव्हाड यांनी स्पष्ट केले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मंजूर झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करण्याची संधी भारतीय जनता पक्षाकडे होती. मात्र, भाजपने ती संधी गमावली. आता भाजप पुन्हा महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मनमानी पद्धतीने आणल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. हे विधेयक आपल्या लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात करणार असल्याचा दावाही नताशा आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी दोन्ही मुद्द्यांची सरमिसळ करू नये असे आवाहनही केले.
Published on: Nov 27, 2026 09:59 AM
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण

