AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर… विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप

Vijay Vadettiwar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात अजून एकही राजकीय व्यक्तीला धडा बसलेला नाही. अशोक खरातविरोधात अनेक महिला, व्यापारी धाडसाने पुढे येत असले तरी त्याच्यासोबत व्यवहार झालेल्या नेत्यांवर मात्र कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकरणाचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

Vijay Vadettiwar: खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर... विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने शिलगला वाद, असे काढले माप
विजय वडेट्टीवार, अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 12:21 PM
Share

Vijay Vadettiwar on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणाने नाशिकच नाही तर राज्य आणि देश हादरला आहे. या भोंदूबाबामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांच्या बैठका आणि व्यवहार आता लपलेले नाहीत. अनेक महिला आणि व्यापारी धाडसाने त्याच्याविरोधात पुढे सरसावल्या आहेत. राजकीय वलयाचा फायदा घेत खरातने अनेकांचे जीव नासवले. विरोधक खरातप्रकरणावरून सरकार आणि यंत्रणांना टार्गेट करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची संधी सोडली नाही.

मुसलमान असता तर…

अशोक खरात याच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. जात धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी याप्रकरणात समाजाची आणि सध्याच्या मानसिकतेची कानउघडणी केली.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवा अंतर्गत आज संध्याकाळी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते, त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खरात प्रकरण सरकारनेच बाहेर काढले

तर वडेट्टीवार यांच्या या विधानावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेव्हा हे प्रकरण आले. तेव्हा नाशिक पोलिसांना त्यांनी सूचना दिली. गुप्तपणे त्याला रात्रीतून अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आणि हे प्रकरण बाहेर काढण्यात सरकारचाच हात असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये खरात प्रकरणावरून द्वंद सुरू आहे. तर खरात याचे दिवसागणिक एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. तर याप्रकरणाच्या अवतीभोवती राजकीय कथाही रचल्या जात आहे. त्यात खरात आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा ही करण्यात येत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक