Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या रद्द झालेल्या 18 रेल्वे आजपासून पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत
Nashik Railway
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 7:05 AM

नाशिकः एक अतिशय गोड आणि नाशिकरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी बातमी. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसचा श्रीगणेशा आजपासून होत आहे. तर दुसरीकडे नाशिक-मनमाड मार्गावरच्या रद्द झालेल्या 18 रेल्वे गाड्या आजपासून पूर्ववत होत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.

असा आहे मार्ग

नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर 7.26 ला जळगाव, 10.09 वाजता चाळीसगाव, 12.08 वाजता मनमाड, 01.23 वाजता नाशिक आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सकाळी सव्वानऊ वाजता ही गाडी इगतपुरी येथून निघणार आहे. तर भुसावळवला ही गाडी सायंकाळी 05.10 वाजता पोहचेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

रद्द गाड्याही आजपासून पू्र्ववत

मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे नाशिक मार्गावरच्या 18 रेल्वे काल 9 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल प्रवासी करत होते. आत्या त्या रद्द झालेल्या गाड्या आज रविवारपासून पूर्ववत धावत आहेत. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या रद्द झालेल्या फेऱ्या आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत.

नाशिक-कल्याण सुरू करा

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे.

इतर बातम्याः

Nashik|कोरोनाचे बळी 4 हजार अन् अनुदानासाठी अर्ज आले 8 हजार; मग मृतांची आकडेवारी खोटी की, अर्जदार बोगस?

Nashik Election|नाशिकमध्ये 800 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करा, आता काँग्रेसची मागणी

Agricultural scam|16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू; पोलिसांच्या तिघांना बेड्या

Non Stop LIVE Update
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.