Nashik Election|नाशिकमध्ये 800 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करा, आता काँग्रेसची मागणी

नाशिक महापालिकेत घरपट्टी माफ करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस साऱ्यांनीच केली आहे. त्यामुळे होणार काय, याची उत्सुकता लागली आहे.

Nashik Election|नाशिकमध्ये 800 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करा, आता काँग्रेसची मागणी
Nashik Municipal Corporation

नाशिकः नाशिकमध्ये 800 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्यात आली. तसाच प्रयोग नाशिकमध्ये करण्यात यावा, अशी मागणी भाजप आणि शिवसेनेने केली होती. आता काँग्रेसने त्याच्याही पुढे जात चक्क 800 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करावी, अशी मागणी केली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यताय. त्यामुळे घरपट्टीचा मुद्दा चर्चेत येतोय.

सारेच पक्ष अनुकुल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले. नगरविकास खात्याची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा केली. आता तोच कित्ता नाशिकमध्ये गिरवण्याचा प्रयत्न सुरू झालेले दिसतायत. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसही पुढे सरसावली आहे.

पालकमंत्रीही सकारात्मक

मुंबईप्रमाणेच नाशिक महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटांच्या सदनिकांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केलीय. यावर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडील बैठकीत सदरच्या विषयावर सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. शिवसेनेने आम्ही यापूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशीच मागणी केल्याचे म्हटले आहे. मात्र, सध्या तरी महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे ही मागणी खरेच मान्य होते का, याची उत्सुकता आहे.

वस्तुस्थिती काय?

नाशिक महापालिकेने 2021-22 आर्थिक वर्षात घरपट्टीतून 150 कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 107 कोटींची वसुली झालीय. त्यात मागील थकबाकी 400 कोटींवर गेलीय. नाशिक महापालिका हद्दीत 4 लाख 55 हजार मिळकतीयत. त्यात पाचशे चौरस फुटापर्यंत बहुतांश मध्यवर्गीय आहेत. मात्र, एकीकडे नाशिक महापालिकेची जकात रद्द झाल्यानंतर घरपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यातही यापूर्वीच 500 फुटांपर्यंतच्या मालमत्तांना आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीवरी शास्ती रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी माफी करता येणे शक्य नाही, असे संकेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यापूर्वीच दिले आहेत.

इतर बातम्याः

Agricultural scam|16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू; पोलिसांच्या तिघांना बेड्या

Nashik Corona| ओमिक्रॉनने झपाटले; नाशिकमध्ये एका दिवसात 1 हजाराने वाढले रुग्ण

Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?

Published On - 2:25 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI