Agricultural scam|16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू; पोलिसांच्या तिघांना बेड्या

शेतकरी योगेंद्र सापटे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Agricultural scam|16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू; पोलिसांच्या तिघांना बेड्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:13 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या 147 शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या 16 कृषी अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा फास आवळत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी तीन संशयितांना अटक केल्याचे समजते. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत इतरांची नावे आणि बरेच धागेदोरे समोर येऊ शकतात. विशेषतः या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरीही पुढे येऊन तक्रार देऊ शकतात.

न्यायालयाने केली चौकशी सुरू

कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यात सहा वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. विशेष म्हणजे या घोटाळ्याची चौकशी सुरू करण्याचे आदेश स्वतः न्यायालयाने दिले आहेत. त्याचे झाले असे की, पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे पाहिले. तशा निविदा निघाल्या. त्यांनी 2011 मध्ये अशा योजनेत कामे मिळावीत म्हणून अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेतली. 100 रुपयांच्या कोऱ्या स्टँपपेपरवर तिकीट लालेल्या कोऱ्या 50 पावत्या तसे कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या. या साऱ्याचा गैरवापर केला. सापटे यांना शेतीची कामे दिली. मात्र, त्यांच्या खात्यावरून 2011-2017 या काळात परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे इतर 147 शेतकऱ्यांना गंडवण्यात आले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांना फसवले. दुसरीकडे शासनाच्या विविध योजनांचा निधी फस्त केला. याप्रकरणी शेतकरी सापटे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

संशयित रडारवर

याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे म्हणतात की, या प्रकरणी 2018 मध्ये तक्रारदाराने लोकशाही दिनात तक्रार दाखल केली. चौकशीनंतर 2019 मध्ये ते निकाली काढले. गैरसमजातून तक्रार दाखल केल्याचे तक्रारदाराने लेखी लिहून दिले आहे. त्याची छायाचित्रेही आमच्याकडे आहेत. मात्र, तक्रादार योगेश सापटे यांनी आपण तक्रार केली होती. मात्र, कोरोना असल्यामुळे आपल्याला कार्यालयातच येऊ दिले नाही. सहा महिन्यानंतर गेल्यावर मला अर्ज निकाली काढल्याचे कळाले. यासंदर्भात मी विभागाकडे लेखी मागितले. मात्र, विभागाने काहीही दिले नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात त्यांच्या चौकशीतून दुसरी नावे समोर येऊ शकतात. अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.

या कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे

– कृषी अधिकारी शीलानाथ पवार (रा. मानूर, ता. कळवरण) – सरदारसिंग राजपूत (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) – एम. बी. महाजन (रा. ता. पेठ) – अशोक घरटे (रा. सागुडे, जि. धुळे) – विश्वनाथ पाटील (रा. परधाडे, जि. जळगाव)

या कृषी सहायकांवर गुन्हे

– राधा सहारे (रा. कुकडणे, ता. सुरगाणा) – प्रतिभा माघाडे (रा. दिंडोरी)

या कृषी पर्यवेक्षकांवर गुन्हे

– किरण कडलग (रा. जवळे कडला, ता. संगमनेर) – मुकुंद चौधरी (रा. उंबरी, ता. राहुरी) – दिलीप वाघचौरे (रा. सोलापूर)

या संशयितांवर गुन्हे

– दिलीप फुलपगार – दीपक कुसळकर – विठ्ठल रंधे – संजय पाटील – नरेश पवार – दगडू पाटील

इतर बातम्याः

Nashik Corona| ओमिक्रॉनने झपाटले; नाशिकमध्ये एका दिवसात 1 हजाराने वाढले रुग्ण

Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?

Nashik Corona|कोरोनाविरोधात लढा आमचा सुरू; 13 अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशासनाने काय केली तयारी?

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.