लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर

Ashok Kharat Video Controversy : भोंदूबाबा अशोक खरातचं सर्वात किळसवाणं सत्य समोर आलं आहे. महिलेसोबत लग्नाआधी नेमकं काय घडलेलं? याबद्दल मोठं रहस्य समोर आलं आहे.

लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
Ashok Kharat
| Updated on: Apr 10, 2026 | 9:11 AM

Ashok Kharat Video Controversy : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवलं आहे, तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये की, ज्याच्या पायाची धूळ कपाळावर लावायचो… ती व्यक्ती सर्वांच्या भावनांसोबत खेळत आहे… भोंदूबाबा बद्दल अनेक खुलासे होत असताना अन्य एका महिलेने भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणला आहे. महिलेचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या आधी अशोक खरात याने तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्या काही मिनिटांत काय काय झालं… यावर महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे.

तुझं कन्यादान स्वतः करेल म्हणत केलं घाणेरडं काम…

पीडितेने कॅप्टन बाबा उर्फ ​​अशोक खरातविरुद्ध पहिला एफआयआर दाखल केला आणि त्याचं भीषण सत्य सर्वांना सांगितलं. महिला म्हणाली, ‘2019 मध्ये खरात बाबाला पहिल्यांदा भेटली होती. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तू माझी सर्वांत आवडती मुलगी आहेस… तुझं कन्यादान मीच करेल… बाबाचे हे शब्द ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला… त्यानंतर सर्व कुटुंबियांना भेटण्यासाठी मी घेऊन गेले… त्यानंतर माझं लग्न देखील होणार होतं… तेव्हा लग्नाच्या आधी दर्शन घेण्यासाठी बाबाने मला आश्रममध्ये बोलावलं होतं… ‘

Loading...

2022 मध्ये पीडित महिलेचं लग्न होणार होतं. महिला म्हणाली, ‘माझ्या होणाऱ्या पतीसोबत मी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. तेव्हा बाबाने सांगितलं लग्नाआधी ईशान्येश्वर महादेव मंदिरात सिद्धपूजा करावी लागेल. त्यासाठी तुला एक दिवस यावं लागेल… त्यानंतर तुला भविष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत. ‘

‘मग त्याने मला पूजेच्या विधींबद्दल सांगण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्याने आतून दरवाजा बंद केला आणि म्हणाला- काळजी करू नकोस, मी तुला पुष्कराज देत आहे, तुझ्यासोबत सर्व काही ठीक होईल. येथे त्याने मला थोडा प्रसाद दिला, जो खाल्ल्यानंतर मी बेशुद्ध पडले. येथे त्याने माझ्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. यानंतर, त्याने नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत तीन वर्षे मला मादक पदार्थ देऊन माझ्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितले की, बदनामीच्या भीतीने मी आणि माझे कुटुंब पुढे आलो नाही… आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us