Nida Khan : टीसीएस प्रकरणानंतर आता घटस्फोटाची सुनावणी; गरोदर निदा खान नाशिक रोडच्या कोर्टात

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान आज नाशिक रोडच्या कौटुंबिक न्यायालयात हजर झाली आहे. पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. निदा खान गरोदर असून, यापूर्वी तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. या सुनावणीत पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.

Nida Khan : टीसीएस प्रकरणानंतर आता घटस्फोटाची सुनावणी; गरोदर निदा खान नाशिक रोडच्या कोर्टात
Nida khan divorce case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 6:05 PM

नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या घटस्फोट प्रकरणाची सुनावणी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. निदा खान नाशिक रोडच्या कौटुंबिक न्यायालयात दाखल झाली आहे. निदा खानला पतीकडून विभक्त होण्याची नोटीस देण्यात आली आहे. नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयात सुनावणीला सुरवात झाली आहेय निदा खान गरोदर असूनही कौटुंबिक न्यायालयात हजर झाली आहे. टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार आणि लैगिक शोषण प्रकरणात निदा खान ही आरोपी आहे. निदा खान गरोदर असल्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आज निदा खान पतीने दाखल केलेल्या घटस्फोट अर्ज प्रकरणी नाशिक रोड कौटुंबिक न्यायालयात हजर झाली आहे.

नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरण खूप चर्चेत होतं. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा एजाज खान हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. निदा खान गर्भवती असल्याने तिला जामीन दिल्याचं समोर आलं होतं. नाशिक सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलेला आहे.

Loading...

दरम्यान, निदाच्या वैयक्तिक जीवनातही या प्रकरणाचे पडसाद पहायाला मिळाले होते. प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खानला न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करत असताना वैवाहिक आयुष्यात मोठे संकट आले. निदा सध्या 8 महिन्यांची गरोदर आहे. 2 ते 3 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. निदाचा काैटुंबिक कलह टोकाला गेला आहे. त्याकारणानेच निदाच्या पतीने थेट कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

याच अर्जाची दखल घेत निदाला कोर्टाने समन्स बजावला होता. 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात तिला प्रत्यक्षात हजर होण्याचा आदेश देण्यात आला होता. बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निदा खान हिच्यासह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर कोर्टाने निदाचा जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, मार्च महिन्यापासून टीसीएसमधील गंभीर गुन्ह्यामध्ये नाव आल्यापासून पोलिस तपास आणि न्यायालयीन चाैकशीच्या सावटामुळे निदाच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. बदनामी आणि ओढवलेली नामुष्की यामुळे निदाच्या नवऱ्याने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us