Nashik Accident | नाशिकच्या घोटी देवगाव रस्त्यावर मोठा अपघात, तीन शिक्षिका जखमी

| Updated on: Jul 27, 2022 | 1:13 PM

घोटी देवगाव रस्त्यावर आज सकाळी एक अपघात झालायं. या अपघातामध्ये तीन शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांच्यावरती रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या तिन्ही शिक्षिका एकाच शाळेतील असून आज सकाळी शाळेमध्ये जाण्यास निघाल्यावर हा अपघात झाला आहे.

Nashik Accident | नाशिकच्या घोटी देवगाव रस्त्यावर मोठा अपघात, तीन शिक्षिका जखमी
Image Credit source: tv9
Follow us on

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हातील घोटी देवगाव रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडलीयं. घोटी देवगाव रस्त्यावर अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन शिक्षिका जखमी झाल्याची माहिती मिळतंय. देवगाव आश्रम शाळेतील या शिक्षिका (Teacher) आहेत. आज सकाळी या शाळेमध्ये जाण्यासाठी निघाल्या असतानाच हा अपघात झालायं. याच आश्रम शाळेतील मुलीला मासिक पाळीमुळे वृक्षारोपण करण्यास रोखण्यात आल्याचा आरोप (Accusation) करण्यात आला होता. मुलीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करू न दिल्याने जिल्हात एकच खळबळ निर्माण झालीयं.

घोटी देवगाव रस्त्यावर आज सकाळी मोठा अपघात

घोटी देवगाव रस्त्यावर आज सकाळी एक अपघात झालायं. या अपघातामध्ये तीन शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांच्यावरती रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या तिन्ही शिक्षिका एकाच शाळेतील असून आज सकाळी शाळेमध्ये जाण्यास निघाल्यावर हा अपघात झाला आहे. अपघातामधील तिन्ही शिक्षिकेंची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. देवगाव येथील आश्रम शाळेत या शिक्षिका जात असताना हा अपघात झालायं.

हे सुद्धा वाचा

आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळेत दाखल

देवागाव आश्रम शाळेत कालच एक धक्कादायक घटना घडलीयं. आश्रम शाळेतील विद्यार्थिनींकडून परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले. तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असे म्हणत एका शिक्षकाने विद्यार्थींला वृक्षारोपण करू दिले नव्हते. या घटनेची चौकशी करण्यासाठी आज आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळेत दाखल झाले होते.