AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambarnath crime : अंबरनाथमध्ये निवृत्त शिक्षिकेला मोलकरणीचा गंडा, दागिन्यांसह ATM कार्ड घेऊन मोलकरीण पसार

Ambarnath News : बँकेतून फोन आल्यानंतर आपल्याला गंडा घालण्यात आला आहे, याची जाणीव निवृत्त शिक्षिकेला झाली.

Ambarnath crime : अंबरनाथमध्ये निवृत्त शिक्षिकेला मोलकरणीचा गंडा, दागिन्यांसह ATM कार्ड घेऊन मोलकरीण पसार
निवृत्त शिक्षिकाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 7:45 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnath Crime News) एका निवृत्त शिक्षिकेला मोलकरणीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता पोलिसांकडून मोलकरणीचा शोध घेतला जातोय. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार उडकीस आल्यानं निवृत्त शिक्षिकेच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेतून फोन आल्यानंतर आपल्याला गंडा घालण्यात आला आहे, हे समोर आलं. मात्र तोपर्यंत मोलकरीण घरातून पसार झाली होती. मोलकरणीने आपल्या पतीच्या मदतीने निवृत्त शिक्षिकेला लुटलं. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना चोरी करणारी मोलकरणीच होती, हे स्पष्ट झालंय. आता सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांची चौकशी करुन फरार आरोपींचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय. मात्र या घटनेमुळे घरातील मोलकरणींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

काय काय लुटलं?

अंबरनाथच्या कानसई सेक्शन परिसरात शीला महाले या सेवानिवृत्त शिक्षिका वास्तव्याला आहेत. त्यांची मुलगी विवाहित असून घरी त्या एकट्याच राहत असल्यानं त्यांनी एका एजन्सीमार्फत घरात घरकाम आणि अन्य कामांसाठी सीमा नावाची मोलकरीण नेमली होती. या मोलकरणीने शीला महाले यांच्या कपाटातील सोन्याची चेन, सोन्याचं लॉकेट आणि एटीएम कार्ड चोरून नेलं.

सीसीटीव्ही फुटेजमुळे भांडाफोड

मुलाला साप चावल्याचा बहाणा करून सीमा ही गायब झाली. यानंतर शीला यांच्या एटीएम कार्डमधून एक लाख 40 हजार रुपये काढण्यात आल्यानंतर बँकेतून शीला महाले यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला. सीमा आणि तिच्या पतीने हे पैसे काढल्याचं बँकेच्या एटीएममधील फुटेजवरून स्पष्ट झालं. यानंतर शीला महाले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 381 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलिसांकडून सीमा आणि तिच्या पतीचा शोध घेतला जातोय.

निवृत्त शिक्षिका शीला महाले यांनी मोलकरीण म्हणून कामाला ठेवलेल्या सीमावर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनीही लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. सध्या अंबरनाथ पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.