AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar : अर्जुनला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का, क्रिकेटरसोबत काय झालं?

Arjun Tendulkar and Saaniya Chandok Marriage :अर्जुन तेडुंलकर आणि सानिया चांढोक यांच्या आयुष्यातील नव्या इनिंगला 5 मार्चपासून सुरुवात झाली. अर्जुन लग्नाच्या काही तासांनी मैदानात उतरेल आणि क्रिकेट खेळेल असं अपवाद वगळता कुणालाही वाटलं नसेल. अर्जुन क्रिकेटप्रती समर्पण दाखवत मैदानात उतरला. मात्र त्याला मोठा झटका लागला.

Arjun Tendulkar : अर्जुनला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का, क्रिकेटरसोबत काय झालं?
Arjun Tendulkar and Saaniya Chandok MarriageImage Credit source: @Dev_Fadnavis X Account and PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 10:09 PM
Share

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय, सातत्य आणि चिकाटी महत्त्वाची असते. सहजासहजी काहीही मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. हीच बाब क्रिकेटपटूंनाही लागू होते. चांगली वाईट कशीही स्थिती असोत खेळाडूंना क्रिकेटला प्राधान्य द्यावं लागलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेटपटू रिंकु सिंह याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र वडिलांच्या निधनाच्या काही तासांनंतर रिंकु टीम इंडियासह जोडला गेला. अनेक खेळाडूंना आपल्या जबाबदारीमुळे कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. अनेक गोष्टींसह तडजोड करावी लागते. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यालाही याचा प्रत्यय आला.

अर्जुन लग्नाच्या काही तासांनंतर एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीमसह जोडला गेला. मात्र अर्जुनला मोठा झटका लागला. अर्जुन आणि त्याच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.

अर्जुनचा मुंबईत शाही विवाह

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑलराउंडर अर्जुन तेंडुलकर याचं गुरुवारी मुंबईत सानिया चांढोक हीच्यासह विवाह पार पडला. अर्जुनच्या लग्नाला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. अर्जुनच्या लग्नाची चांगलीच चर्चा रगंली. अर्जुनच्या लग्नात त्याची मोठी बहिण सारानेही चांगलाच भाव खाल्ला. संपूर्ण सोहळा निर्विघ्न पार पडला.

लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य साधारणपणे देवदर्शनाला किंवा विदेश दौऱ्यावर जातात. मात्र अर्जुनने या सर्व प्रकाराला छेद देत क्रिकेटला प्राधान्य दिलं. अर्जुन लग्नानंतर थेट जर्सी घालून मैदानात हजर झाला.

अर्जुन कोणत्या स्पर्धेत सहभागी?

अर्जुन लग्नानंतर नवी मुंबईत आयोजित डीवाय पाटील टी 20 स्पर्धेत सहभागी झाला. अर्जुन या स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. अर्जुन उपांत्य फेरीचा सामना असल्याने लग्नानंतर सामन्यासाठी हजर राहिला. मात्र या सामन्यात अर्जुनच्या टीमला पराभूत व्हावं लागलं.

मुंबई कस्टमचा विजय

या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात अर्जूनच्या टीमसमोर मुंबई कस्टमचं आव्हान होतं. मुंबई कस्टमने हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली.

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभव भोपळाही फोडण्यातही अपयशी ठरला. तसेच अर्जुन 9 धावांवर आऊट झाला. कॅप्टन शशांक सिंह याने टीमसाठी सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. अर्जुनच्या संघाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये जवळपास 8 च्या रनरेटने 156 धावा केल्या. प्रत्युत्तराच मुंबई कस्टमने विजयी आव्हान हे 24 बॉलआधीच अर्थात 16 ओव्हरमध्ये पूर्ण करत अंतिम फेरी गाठली. या एका पराभवामुळे अर्जूनच्या टीमची इथवर पोहचण्याची सर्व मेहनत वाया गेली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया