Nashik | गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झालीयं. यामुळे आता भाविकांची आणि पर्यटकांनी नदी काठावर मोठी गर्दी केलीयं. गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस संपूर्ण नाशिक जिल्हात सुरू होता.

Nashik | गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 12:32 PM

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात पावसाने विश्रांती घेतलीयं. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलायं. शहरात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झालीयं. गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, आता पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलायं. इतके नाही तर आता गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्हातील अनेक नद्यांना पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने आता गंगापूर धरणातील विसर्ग थांबवण्यात आला आहे. यामुळे गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

हे सुद्धा वाचा

जुलै महिन्यात नाशिक जिल्हात दमदार पाऊस

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी झालीयं. यामुळे आता भाविकांची आणि पर्यटकांनी नदी काठावर मोठी गर्दी केलीयं. गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस संपूर्ण नाशिक जिल्हात सुरू होता. जून महिन्यात पावसाने नाशिककडे पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात जोरदार पाऊस नाशिक जिल्हात झाला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.