‘मला लस नको, भीती वाटतीय’, नाक मुरडणाऱ्या आजीबाई लसीकरणासाठी तयार कशा झाल्या, Video पाहाच

| Updated on: Oct 29, 2021 | 1:18 PM

लसीकरणाची भीती वाटणाऱ्या एका आजीबाईंना आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनवण्या करून लसीकरण करुन घेतल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील मटाने गावातील हा व्हिडिओ आहे.

मला लस नको, भीती वाटतीय, नाक मुरडणाऱ्या आजीबाई लसीकरणासाठी तयार कशा झाल्या, Video पाहाच
लसीकरणाची भीती वाटणाऱ्या एका आजीबाईंना आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनवण्या करून लसीकरण करुन घेतल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Follow us on

नाशिक : लसीकरणाची भीती वाटणाऱ्या एका आजीबाईंना आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनवण्या करून लसीकरण करुन घेतल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील मटाने गावातील हा व्हिडिओ आहे.

आरोग्य सेविका नंदिनी ओम भामरे ,आरोग्यसेवक शिवाजी सोनवणे,आशा सेविका वंदन पवार ,समुदाय आरोग्य अधिकारी तिलोत्तमा देवरे हे लसीकरणासाठी शेत शिवारातून फिरत असताना जिजाबाई सावंत हा शेतमजूर आजींना त्यांनी लस घेण्याबाबत विनंती केली. मात्र आजी भीतीपोटी लस घेण्यास नकार देत होत्या. मात्र आरोग्य कर्मचारी व आजोबा दत्तू सावंत यांनी आजीबाईंना विश्वासात घेत अखेर लस दिली. हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

लसीकरणाबाबत समाजात बरेच समज गैरसमज आहेत. अनेक शिक्षित व्यक्तीही लसीकरणासाठी राजी होत नसल्याचे अनेक व्हिडीओ आपण समाजमाध्यमांवर पाहिजे, तिथे अशिक्षित अडाण्यांची काय कथा! पण अशा परिस्थितीतही भारताने नुकताच 100 कोटी लसीकरणाच्या डोसचा विक्रम करुन दाखवला. यात सगळ्यात मोठं श्रेय आहे, आरोग्य यंत्रणेचं!

अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत बऱ्याच अंधश्रद्धा असूनही आरोग्य कर्मचारी मोठे परिश्रम घेऊन संबंधित व्यक्तींना लसीकरणाविषयी जागरुक करतात, त्यांना लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगतात. नाशिकचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आरोग्य यंत्रणेचं, डॉक्टर नर्सचं कौतुक करावं करावं तितकं कमी आहे.

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

VIDEO: काँग्रेस नेते वेल कल्चर, ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी

केपी गोसावी आणि भाजप नेत्याच्या पत्नीची खासगी कंपनीत पार्टनरशीप, तो नेता कोण? विधानसभेत सांगणार; मलिकांकडून फटाक्यांची माळ सुरुच