केपी गोसावी आणि भाजप नेत्याच्या पत्नीची खासगी कंपनीत पार्टनरशीप, तो नेता कोण? विधानसभेत सांगणार; मलिकांकडून फटाक्यांची माळ सुरुच

गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर त्यांची पाठराखण करणारी भाजपही मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर आहे.

केपी गोसावी आणि भाजप नेत्याच्या पत्नीची खासगी कंपनीत पार्टनरशीप, तो नेता कोण? विधानसभेत सांगणार; मलिकांकडून फटाक्यांची माळ सुरुच
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:14 PM

मुंबई :  गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी तुफान बॅटिंग केलीय. दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ते नवा पॉइंट शोधून काढून वानखेडे, गोसावी यांच्यावर कडाडून हल्ले चढवतायत. कालपर्यंत एनसीबी, वानखेडे यांच्या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या मलिकांनी आता नवा आरोप करुन बॉम्ब फोडलाय.

गोसावी आणि भाजप नेत्याच्या पत्नीची पार्टनरशीप, तो नेता कोण, अधिवेशनात नाव सांगणार!

ठयेत्या 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील. माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसंच भाजपच्या कोणत्या नेत्याचे बायकोचे केपी गोसावीच्या कंपनीसोबत पार्टनरशीप आहे, हे मी अधिवेशनार सांगणार असल्याचा ब़ॉम्ब मलिकांनी फोडला.

गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची एका खासगी कंपनीत पार्टनरशीप आहे. त्यांची बायको गोसावीच्या एका कंपनीत पार्टनर आहे. मी आता त्यांचं नाव घेणार नाही. विधानसभेत हे नाव सांगू. पिक्चरचा शेवट जो बोगस आणि फर्जी माणूस आहे त्याची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे, हे यंत्रणेच्या माध्यमातून नाही. बोगस सर्टिफिकेटच्या आधारे बोलतोय. पिक्चरचा शेवट केव्हा होईल जेव्हा निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येत नाही आणि या सर्व केसेसे कशा फेक आहेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत या पिक्चरचा शोध होणार नाही, असं ते म्हणाले.

त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही

पोपटाला वाचवण्यासाठी सर्व लोक पुढे पुढे पळत आहेत. पण विधानसभेत सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही, तसे माझे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगून त्यांनी भाजपला सूचक इशारा दिला.

काशिफ खानकडे किती लोकांचे पैसे आहेत. त्याच्या माध्यमातून काय काय होते… काशिफ खानची कसून चौकशी झाली तर बरंचसं काय यातून उघड होणार आहे. काही हत्यार माझ्याकडे राहू द्या. विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आता बोललो तर काही लोक कोर्ट कचेऱ्यात जातील. त्यामुळेच विधानसभेत मी काही गोष्टी मांडणार आहे. तेव्हा या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या :

महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

VIDEO: राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला

ज्यानं इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागं कोर्ट कचेऱ्या, छगन भुजबळांचा समीर वानखेडेंना टोला

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.