महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. ('Picture Abhi Baaki Hai Mere Dost’: Nawab Malik)

महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:05 AM

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2 ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलली आहे. जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो आता तुरुंगात आहे. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता. पोलिसांनी जी चौकशी सुरू केली आहे, ती सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या म्हणत होता. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा मलिक यांनी दिला.

वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच बोललो नाही

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचं आहे. काल तीन लोकांना जामीन मिळाला. वानखेडे आल्यानंतर एनसीबीने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं. एक महिन्याच्या आत आता अनेक गोष्टी बदलत आहेत. वानखेडेंनी सर्व हातखंडे वापरले. आधी म्हणाले की माझ्या कुटुंबला या प्रकरणात घुसडण्यात येत आहे. माझ्या मरहूम आईचंही या प्रकरणात नाव घेतलं. पण मी कधीच त्यांच्या आईचं नाव घेतलं नाही. मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला. पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही. माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही. लढाई ही अन्यायाविरोधात आहे, असं त्यांनी सांगितलं.

दाढीवाल्याला अटक का नाही?

मी एका दाढीवाल्याचं नाव घेतलं होतं. या दाढीवाल्याचं नाव काशिफ खान असं आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. तो सेक्स रॅकेट चालवतो. तो समीर वानखेडेंचा मित्रं आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? असा सवाल मलिक यांनी केला.

संबंधित बातम्या:

राजकारणातल्या 2 मॅचफिनीशरकडून क्रिकेटमधल्या दिग्गजांचा सन्मान, पवार ठाकरेंसोबत गावस्कर वेंगसरकरांची आठवणींची ‘पार्टनरशीप’!

जलयुक्त शिवार योजनेचे लाभार्थी राजकीयच, क्लिनचिट नसताना मिळाली म्हणून बोंबलतायत, कुठे मिळते हे अजब रसायन?, सामनातून टीका

मोदी सरकारचा मोठा निर्णय; शक्तिकांत दास आणखी तीन वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कायम

(‘Picture Abhi Baaki Hai Mere Dost’: Nawab Malik)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.