ज्यानं इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागं कोर्ट कचेऱ्या, छगन भुजबळांचा समीर वानखेडेंना टोला

छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुंबई ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, असा टोला छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे.

ज्यानं इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागं कोर्ट कचेऱ्या, छगन भुजबळांचा समीर वानखेडेंना टोला
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री


पुणे: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुण्यात आहेत. छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुंबई ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, असा टोला छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना लगावला आहे. समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मुस्लीम आहे, असं सिद्ध झालंय, असंही छगन भुजबळ नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या पाठिशी

आर्यन खान प्रकरण, समीर वानखेडे, के. पी. गोसावी प्रकरणी नवाब मलिक मांडत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे, पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असंही ते म्हणाले.

सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आर्यन खानचा जामीन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचा एकमेकांना काही संबध नाही.शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देतच आहे, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी भाजपला दिलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेक

शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत आहे. शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात येत आहे.भारत सरकारच्या तपासयंत्रणा ज्या आहेत त्या भाजप विरोधी सरकार असतील तिथं अतिरेक करत आहेत. चुकीचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत. शेतकरी महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराष्ट्र हा विमानतळ, गोद्या, जेठ्ठीसाठी प्रसिद्ध आहे तसा तो बॉलिवू़ड साठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप महाविकास आघाडी सरकारविषयी जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय.

गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 30 हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले त्याचं काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. त्या प्रकरणाचा फोकस बदलण्यासाठी महाराष्ट्रावर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आर्यन खानला जामीन मिळाला आहे. ज्याने त्याला पकडलं त्यानं कायद्याच्या विरोधात काम केलं तो अडचणीत आलाय, असं भुजबळ म्हणाले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत हे निकाहनाम्यावरून सिद्ध झालंय. नवाब मलिक देखील मुस्लिम आहेत. त्यांच्या मागे राष्ट्रवादी उभी आहे, असं भुजबळ म्हणाले. भाजप विरोधी सरकार जिथे जिथे आहेत, तिथे तपास यंत्रणा चुकीचे काम करतायत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांनी संयम बाळगळा पाहिजे, सरकार त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

नागपूरच्या नाट्यरसिकांसाठी पर्वणी! खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन, थेट मोबाईलवर प्रक्षेपण

समीर वानखेडेंची चौकशी, साक्षीदाराचे आरोप; ज्येष्ठ वकील उज्जवल निकम म्हणतात…

Chhagan Bhujbal said Sameer Wankhede will face court matters who arrest peoples and said ncp support Nawab Malik

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI