Malegaon Police : पोलीस कुटुंबियांचा जीव धोक्यात, जीर्ण होत आलेल्या इमारतीत धोकादायक स्थितीत; नव्या इमारतीला मिळेना मुहूर्त

| Updated on: Jul 24, 2022 | 9:01 AM

तत्कालीन शासनाने पोलिसांसाठी नव्याने वसाहत बांधल्या आहेत. याठिकाणी सर्व सुसज्ज सोयीसुविधा आहेत. मात्र केवळ उद्घाटन न झाल्याने या इमारती कुलूपबंद आहेत.

Malegaon Police : पोलीस कुटुंबियांचा जीव धोक्यात, जीर्ण होत आलेल्या इमारतीत धोकादायक स्थितीत; नव्या इमारतीला मिळेना मुहूर्त
पोलीस कुटुंबियांचा जीव धोक्यात, जीर्ण होत आलेल्या इमारतीत धोकादायक स्थितीत; नव्या इमारतीला मिळेना मुहूर्त
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नाशिक – सण असो या मारहाण, दंगल आदी कुठल्याही घटनांमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका निभावतात ते म्हणजे पोलीस कर्मचारी. मालेगाव (Malegoan) हे जिल्हा दर्जाचे शहर तसेच क्राईमचे प्रमाण अधिक असताना पोलीस (Police) कर्मचारी संख्या देखील मोठी आहे. कुटुंबियांना सोडून केवळ आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र ऑन ड्युटी असतात. मात्र मालेगाव शहरात परिस्थिती भयाण आहे. आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब मात्र सतत मृत्यूच्या सावटाखाली वावरत आहे. इतकेच नव्हे तर स्वतः पोलीस ड्युटी वरून आल्यावर ते देखील या मृत्यूच्या सावटाखाली वावरतात. पोलीस वास्तव्यास असलेली इमारत (Police Building) मात्र मोडकळीस आली आहे. अनेक घरामधील छताचे गज दिसत आहेत, काही ठिकाणची स्लॅब तुटलेले, तडे गेलेले तर अनेक ठिकाणी स्वछता गृहाचे पाणी लिकेज झाल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. याशिवाय याच दुर्गंधी मध्ये आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आवारात जीव धोक्यात घालून हे कुटुंब मृत्यूच्या दाढेत वावरत आहे.

पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे

गेली कित्येक वर्षांपासून पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. वसाहत जीर्ण होत असल्यामुळे शासनाने पोलिसांसाठी नव्याने स्वतंत्र वसाहत देखील बांधली आहे. मात्र उदघाटनाला मुहूर्त लागत नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून या इमारती बंद आहेत. तर दुसरीकडे जीर्ण होत आलेल्या इमारतीमध्ये पोलीस कुटुंब दिवस काढत आहे

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे नवी वसाहत वापरावाचुन पडून आहे

तत्कालीन शासनाने पोलिसांसाठी नव्याने वसाहत बांधल्या आहेत. याठिकाणी सर्व सुसज्ज सोयीसुविधा आहेत. मात्र केवळ उद्घाटन न झाल्याने या इमारती कुलूपबंद आहेत. एकीकडे पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहेत तर दुसरीकडे नवी वसाहत वापरावाचुन पडून आहेत. पोलीस कर्मचारी देखील नाराज आहेत, मात्र वरिष्ठांसमोर बोलण्याची त्याची हिंमत होत नसल्यामुळे पोलीस चूप आहेत.