तुम्ही फक्त चूक दाखवा, स्वत:चं नाव बदलते, नाशिकच्या पालिका आयुक्तांचं ओपन चॅलेंज, कुंभमेळ्याच्या रस्त्यावरून वातावरण तापलं

नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असून जोरदार कामं सुरू आहेत. पण या कामाच्या दर्जावरून राजकारण पेटलं आहे. असं असताना नाशिक महापालिका आयुक्तांनी टीकाकारांना ओपन चॅलेंज दिलं आहे. त्यांच्या आव्हानानंतर पुढे राजकारण तापणार हे निश्चित झालं आहे.

तुम्ही फक्त चूक दाखवा, स्वत:चं नाव बदलते, नाशिकच्या पालिका आयुक्तांचं ओपन चॅलेंज, कुंभमेळ्याच्या रस्त्यावरून वातावरण तापलं
तुम्ही फक्त चूक दाखवा, स्वत:चं नाव बदलतो, नाशिकच्या पालिका आयुक्तांचं ओपन चॅलेंज, कुंभमेळ्याच्या रस्त्यावरून वातावरण तापलं
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 07, 2026 | 5:27 PM

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका चर्चेत आली असून कोट्यवधींची विकासकामं सुरू आहेत. कारण 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिकेकडून जोरदार कामं सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे साधु संत, भाविक आणि नागरिकांना सुख सुविधा मिळाव्या यासाठी तजवीज केली जात आहेत. त्याचं पार्श्वभूमीवर रस्त्याची कामं देखील सुरू आहेत. पण रस्ता कामाच्या दर्जावरून राजकारण पेटलं आहे. रस्त्याची कामं नित्कृष्ट दर्जाची झाल्याची आरोप विरोधकांनी केला आहे. असं असताना नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्यातील रस्त्यांच्या कामावरून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबतची चूक दाखवा, मी नाव बदलेल, असं ओपन चॅलेंज नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलं आहे. इतकंच काय चार वेगवेगळ्या संस्थांकडून रस्त्यांच्या दर्जाची तपासणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. आयआयटी मुंबईच्या अंतिम तपासणीनंतरच ठेकेदारांना बिल दिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं की, नाशिक मनपाचे कामे चार लेव्हलवर तपासली जात आहे. पीएमसी मॅनेजमेंट स्वतः तपासात आहे. मनपाचे इंजिनिअर, क्वालिटी कंट्रोलचा चेकिंग सेल, इंजिनिअरिंग कॉलेजचे इंटर्न या कामाच्या दर्जाकडे लक्ष ठेवून आहेत. कामाच्या ठिकाणी क्वालिटी आणि सरप्राइज व्हिजिट करतात आणि तपासणी प्रमाणपत्र देत आहे. फॉरेन कंपनीही तपासणी करत आहे. ते सगळे रिपोर्ट देतात. त्यानंतर सगळ्या टेस्ट होतात आणि नंतर कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो.

रस्ते काम चांगले नसल्यास कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एसओपीनुसार चूक असल्यास आधी सूचना देतो, त्यानंतर कारवाईचा बडगा उचलला जातो. दुसरीकडे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करण्याचा कामाला वेग आला आहे. डीजे बंदीच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. पोलीस त्याबाबत लक्ष घालतील आणि निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. इतकंच काय तर कत्तलखाना टेंडरबाबतही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं. याबाबत मलाही माहिती नव्हतं. टेंडर कॅन्सल केलं आहे. कोणत्या विभागाने काढले चौकशी केली जाईल, असं त्या म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us