Onion : तंत्रज्ञानाची कमाल..! सेन्सरद्वारे ओळखता चाळीतील सडका कांदा, गुणवत्ता टिकणार अन् दरही मिळणार

| Updated on: Jun 01, 2022 | 10:48 AM

नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला अधिकचा दर मिळावा म्हणून कांद्याची साठवणूक ही चाळीत केली जाते. राज्यात सर्वाधिक कांदाचाळ ही नाशिक जिल्ह्यातच आहेत. सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याच्या आद्रतेबाबत प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो याचा अंदाज सेन्सरद्वारे येतो.

Onion : तंत्रज्ञानाची कमाल..! सेन्सरद्वारे ओळखता चाळीतील सडका कांदा, गुणवत्ता टिकणार अन् दरही मिळणार
कांदाचाळ
Follow us on

मालेगाव : समस्या कोणतीही असो..त्यावर तोडगा निघणारच. (Onion Stock) कांद्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Onion) कांदा चाळ उभारल्या पण यामधील कांदाही सडू लागला आहे. शिवाय सडलेल्या कांद्याची वेळीच माहिती झाली नाही तर सर्वच कांदा खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे (Nashik) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी गावचे शेतकरी सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी असा काय शोध लावला आहे की चाळीतील कांदा खराब होण्यापासून रोखता येणार आहे. कारण कांदा चाळीतील कोणता कांदा खराब झाला आहे याची माहिती शेतकऱ्यांना सेन्सरद्वारेच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर टळणार आहेच पण कांदा अधिकचा काळ टिकवून ठेवता येणार आहे.

असा ओळखा खराब कांदा

नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला अधिकचा दर मिळावा म्हणून कांद्याची साठवणूक ही चाळीत केली जाते. राज्यात सर्वाधिक कांदाचाळ ही नाशिक जिल्ह्यातच आहेत. सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याच्या आद्रतेबाबत प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो याचा अंदाज सेन्सरद्वारे येतो. यामुळे खराब झालेला कांदा ताबडतोब लक्षात येऊन तो बाहेर काढला जाऊन बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येतो. तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असून अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे.

450 क्विंटल कांद्यासाठी सेन्सरचे 10 युनिट

शेतकरी सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान हे कांदा चाळीत बसवले जाते. पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या साठ फूट चाळणीत सुमारे चारशे ते साडेचारशे क्विंटल कांदा साठवला आहे. यामध्ये या सेन्सरचे दहा युनिट बसवून कांदा सडतोय की खराब होतोय हे कळतं. ही युनिट्स प्रत्येक कप्प्यात पाईपमधून खाली सोडले जातात. गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने त्यांनी ही यंत्रणा बसवली आहे. यासाठी सध्या सव्वा ते दीड लाख रुपये खर्च लागत असला तरी त्याचे महत्व मोठे आहे. कांद्याचे मुल्य वाढते आणि दर मिळला की विक्रीही करता येते.

हे सुद्धा वाचा

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कांदाचाळीतील हे सेन्सर तंत्रज्ञान बसवल्याने कांद्याची नासाडी तर टळतेच पण कांद्याला योग्य दर मिळाला की त्याची विक्री कऱणे सोपे होते. आता कुठे हे तंत्रज्ञान वापराला सुरवात झाली असून नाशिक जिल्ह्यामध्ये 10 कांदाचाळीमध्ये याचा वापर सुरु आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याबाबतची माहिती पोहचवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिवाय या तंत्रज्ञानासाठी शासनस्थरावरुन अनुदान मिळाले तर शेतकऱ्यांना त्याचा अधिक होणार आहे.