राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार, उस्मानाबाद आणि गडचिरोलीच्या शिक्षकांची कामगिरी

| Updated on: Sep 03, 2021 | 7:46 PM

गडचिरोली जिल्ह्यातील खुर्शीद कुतबुद्दीन शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश रघुनाथ खोसे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार आज वर्षा गायकवाड यांनी यांच्या शासकीय निवासस्थानी केला.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार, उस्मानाबाद आणि गडचिरोलीच्या शिक्षकांची कामगिरी
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वर्षा गायकवाड यांच्याकडून सत्कार
Follow us on

मुंबई : देशाचे भवितव्य घडवणारे शिक्षकच समाजाचे खरा आधार स्तंभ आहेत, असे गौरवोद्गार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करताना काढले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केले याचा फायदा भविष्यात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खुर्शीद कुतबुद्दीन शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश रघुनाथ खोसे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार आज वर्षा गायकवाड यांनी यांच्या शासकीय निवासस्थानी केला. (National Award winning teachers felicitated by Varsha Gaikwad)

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील 44 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात मराठवाड्यातील एकमेव शिक्षक म्हणून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे.

खोसे गुरुजींचे अभिनव उपक्रम

ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी साधी मोबाईलला रेंज नाही आशा तांड्यावर मुलांना ऑफलाईन शिक्षण देता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी 51 ऑफलाईन अॅप्सची निर्मिती केली आहे. तसंच मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्याच बंजारा बोली भाषेत पहिलीचं पुस्तक अनुवादित केलं. तसंच त्या भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती.

खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहे. त्यांचे 5 पुस्तके व 47 लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्रशासनाच्या अॅपवर इ कंटेंट तयार केले आहेत. त्यांनी आणि त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तसेच ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारे लोकांनी दिलेले योगदान, ग्रामपंचायत आणि इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांच्या दोन्ही शाळा डिजिटल आहेत. टॅब स्कुल करून मुले वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले. मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अँप्स, गेम्स, टेस्ट तयार केलेल्या आहेत.

केंद्र सरकारकडून खोसेंच्या कार्याची दखल

कोरोनाच्या काळातही त्यांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन 365 दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अॅप तसंच इतर साधनाच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. शा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी-बारावी प्रमाणे शाळेचा ऑनलाईन निकाल लावला आहे. ऑनलाईन निकाल लावणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे. ISO, उपक्रमशील, ACTIVE SCHOOL असलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांबरोबर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गट तयार करून त्यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली शैक्षणिक ध्येयधोरणे ठरवण्यासाठी आणि विद्यार्थी विकास साधण्यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सुचनाही वर्षा गायकवाड यांनी सत्कार समारंभात दिल्या.

2020-21 या शैक्षणिक वर्षात कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य

1. चेतना या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणाची जनजागृती.

2. शाळा तुमच्या दारी या उपक्रमाद्वारे  विद्यार्थ्यांना घरी जाऊन अभ्यास घेणे.

3. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शैक्षणिक कविता व अभ्यास ऐकविणे

4. शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून अभ्यास देणे

5. मुव्हींग लायब्ररीच्या माध्यमातून कथा गोष्टींची पुस्तक घरोघरी पोहचवणे

6. प्रोजेक्टर व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवुन अभ्यास घेणे

7. “भिंत दान” मोहीम जिथे रिकामी भिंत असेल तिथे फळा तयार करून युवकांच्या मदतीने वर्ग घेणे.

8. जंगल क्लासरुम – जंगलात/शेतात पालकाच्या मागे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग.

9. टिली मीली / गोष्टींचा शनिवारच्या माध्यमातून अभ्यास.

10. मी रिपोर्टरच्या माध्यमातून अभ्यासाची माहिती घेणे.

11. ऑनलाईन गृह अभ्यास पत्रिका सोडवायला देणे.

12. शाळेच्या लघुपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले.

13. कॉल करा, अभ्यास मीळवा उपक्रम.

इतर बातम्या :

OBC Reservation : ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती, नाना पटोलेंचा आरोप

आघाडी सरकारच्या विनाशी कारभारामुळे राज्य आर्थिक अधोगतीकडे, अतुल भातखळकरांचा घणाघात

National Award winning teachers felicitated by Varsha Gaikwad