मनोरुग्ण होता म्हणून आधी पट्ट्याने केली मारहाण; नंतर नालेसफाई करताना सापडला त्याचा मृतदेह सापडला

| Updated on: May 22, 2022 | 9:51 PM

तो अचानक बेपत्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वसईतील एका मशिदीसमोर उभा असताना, 2 तरुणांनी त्याला पकडून बेल्टने बेदम मारहाण केली होती. त्याला मारहाण करुन त्यानंतर त्या मनोरुग्णला रिक्षात बसवून घेऊन गेले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मनोरुग्ण होता म्हणून आधी पट्ट्याने केली मारहाण; नंतर नालेसफाई करताना सापडला त्याचा मृतदेह सापडला
मध्य प्रदेशात मुलासाठी पत्नीला केले मोठ्या भावाच्या स्वाधीन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वसई: वसईच्या दिवणमान, समतानगर, अंबाडी रोड, वसई रोड स्टेशन परिसरात सतत फिरणाऱ्या आणि वेगळ्या स्टाईलमुळे शाहरुख खान या नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या मनोरुग्ण (Mentally ill) शाहरुख खानचा नालासोपऱ्याता मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी अपहरण (Kidnapping) झालेल्या या मनोरुग्ण तरुणांचा नालासोपाऱ्यात मृतदेह (Death in Nalasopara) सापडला आहे. तो मनोरुग्ण असल्याने परिसरातील अनेक लोक त्याला ओळखत होते. त्याच्या वेगवेगळ्या हावभावामुळे लोकं त्याला शाहरुख म्हणूनच हाक मारत होते.

नालेसफाई सुरू असताना मृतदेह सापडला

नालासोपारा पूर्व कॅपिटल मॉलजवळ पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू असताना त्याचा मृतदेह सापडला आहे.
प्रदीप पन्नालाल उर्फ शाहरुख खान असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मनोरुग्ण होता. वसईच्या दिवणमान,समतानगर, अंबाडी रोड, वसई रोड स्टेशन परिसरात तो नेहमी फिरत असल्याने त्याला अनेक जण ओळखत होते.

अचानक बेपत्ता;कुटुंबीयांची शोधाशोध

काल तो अचानक बेपत्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वसईतील एका मशिदीसमोर उभा असताना, 2 तरुणांनी त्याला पकडून बेल्टने बेदम मारहाण केली होती. त्याला मारहाण करुन त्यानंतर त्या मनोरुग्णला रिक्षात बसवून घेऊन गेले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्याची अपहरण करून हत्या केली असल्याचा आरोप मृत्यचा भाऊ कन्हैया पन्नालाल यांनी केला आहे.

सीसीटीव्ही ताब्यात

सध्या नालासोपारा आचोळा पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद प्राथमिक अकस्मात अशी झाली असून या घटनेचे सत्य काय आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांना समजलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरु आहे.